आकुर्डी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या "स्वच्छ सर्वेक्षण" उपक्रम उत्कृष्टपणे राबवण्यात आला त्याबद्दल प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयास प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागातील क्षेत्रीय अधिकारी श्रीमती. सुचिता पानसरे, वैद्यकीय अधिकारी राजू साबळे, प्रकल्प सहाय्यक श्री. दत्ता हेंद्रे यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्तात्रय भांगे यांनी प्रमाणपत्र स्वीकारले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकर, उपप्राचार्य डॉ. बी. जी. लोबो, डॉ. एच. बी. सोनावणे यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. रामदास लाड, डॉ. मधुकर राठोड, डॉ. सारिका मोहोळ आणि स्वयंसेवकांनी सर्वेक्षण सर्वेक्षण केले.
Reviewed by ANN news network
on
१०/०३/२०२२ ०५:०४:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: