ज्येष्ठ आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी यांचा सत्कार

 


व्ही के ग्रुप आर्किटेक्ट कंपनीमध्ये आर्किटेक्ट दिन साजरा  


पुणे : तीन ऑकटोबर या आर्किटेक्ट दिनानिमित्त ज्येष्ठ आर्किटेक्ट आणि पुण्यातील नामवंत आर्किटेक्चर कंपनी 'व्ही के ग्रुप' चे संस्थापक विश्वास कुलकर्णी यांचा सत्कार सहकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने सोमवारी करण्यात आला.यावेळी आर्किटेक्ट हृषीकेश कुलकर्णी,डॉ पूर्वा केसकर,अनघा परांजपे -पुरोहित,विजय साने,अपूर्वा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. 

विश्वास कुलकर्णी यांनी प्रसिद्ध वास्तूविशारद चार्ल्स कोरिआ यांच्यासमवेत कामाला सुरुवात केली.कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या 'व्ही के ग्रुप' या आर्किटेक्ट कंपनीने सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.शहर नियोजन,पर्यावरण,ग्रीन बिल्डींग्स,इंटेरिअर डिझाईन अशा क्षेत्रात त्यांनी योगदान दिले आहे. पुण्याचे श्रद्धास्थान असलेले दगडूशेठ गणपती मंदिर,जिल्हा परिषद नवीन प्रशासकीय इमारत,परमार ट्रेड सेंटर अशा १ हजार हुन अधिक  इमारतींची वास्तुरचना, आरेखन  त्यांनी केले आहे.ग्रीन होम्स प्लॅटिनम प्रमाणन व्ही के ग्रुप तर्फे केले जाते.विश्वास कुलकर्णी यांना त्यांच्या योगदानाबद्दल ग्लोबल रिअल इस्टेट काँग्रेसने 'टॉपमोस्ट आर्किटेक्चर लीडर्स' पुरस्काराने गौरवले आहे. 

'आर्किटेक्ट महाविद्यालये आणि आर्किटेक्ट कंपन्या यांनी स्मार्ट,शाश्वत शहर बनविण्याच्या दिशेने एकत्र काम करावे,यासाठी मेंटॉरशिप प्रोग्रॅम तयार केला आहे,अशी माहिती विश्वास कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना दिली.नीतिमान आर्किटेक्ट तयार करणे हे उद्दिष्ट त्यातून साध्य करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.व्ही के ग्रुप चे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने या वर्षात  पुणे शहर नियोजन आणि इतर महत्वाच्या विषयावर दरमहा  चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत',असेही  त्यांनी सांगितले. 



ज्येष्ठ आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी यांचा सत्कार ज्येष्ठ आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी यांचा सत्कार Reviewed by ANN news network on १०/०३/२०२२ ०६:०५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".