जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आरसीएफ कंपनीस दिली भेट
अलिबाग : अलिबाग- थळ येथील आरसीएफ कंपनीच्या एका प्लांटमध्ये आज सायंकाळी स्फोट झाला. या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.
1)दिलशाद आलम इद्रिसी- वय 29 - कुर्ला पश्चिम, कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी, 2) फैजान शेख- वय 33- कुर्ला पश्चिम, कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी, 3)अंकित शर्मा- वय 27- आर.सी.एफ कर्मचारी अशी मृतांची नावे आहेत. 1) अतिंद्र- कुर्ला पश्चिम, 90% भाजलेले, नॅशनल बोन्स ऐरोली या इस्पितळात उपचारार्थ दाखल, 2) जितेंद्र शेळके- भाेनंग, नॅशनल बोन्स ऐरोली या इस्पितळात उपचारार्थ दाखल, 3) साजिद सिद्दिक सलामती- कुर्ला पश्चिम, वय 23 हे जखमी झाले असून त्यांच्यावर फोर्टिस हॉस्पिटल, मुंबई येथे उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आरसीएफ कंपनीस तात्काळ भेट दिली व तेथील परिस्थिती जाणून घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी संबंधितांना मृत व्यक्तींबाबत पुढील आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना दिल्या तसेच जखमी व्यक्तींच्या उपचारांबद्दलची विचारपूस केली.
थळ येथील आरसीएफ कंपनीत स्फोट; तिघांचा मृत्यू
Reviewed by ANN news network
on
१०/२०/२०२२ ०८:१६:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/२०/२०२२ ०८:१६:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: