ठाणे : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 


ठाणे : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राज्यातील सुमारे दीडशे प्रमुख कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिंदे फ़डणवीस सरकारला पाठिंबा दिला.

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, माजी आमदार नरेंद्र पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम, प्रकाश देशमुख, प्रमोद जाधव आणि मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यात शिंदे फ़डणवीस  सरकार  सत्तेत आल्यापासून मराठा समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.  अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अधिक सक्षम करण्याचा निर्णय, सारथी संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरू करून त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय, मराठा तरुणांसाठी वसतीगृह उभारणे किंवा त्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या संख्येत आणि तरतुदीत वाढ करणे असे अनेक निर्णय घेण्याबाबत शिंदे फ़डणवीस  सरकारने सकारात्मकता दाखवली. याचा विचार करून या र्यकर्त्यांनी युती सरकारला समर्थन देण्याचा निर्णय घेतला. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत पुनर्विचार याचिका दाखल करणे, तसेच मराठा कुटुंबांच्या जमिनींच्या सातबारा नोंदींद्वारे निघत असलेले वेगवेगळे निष्कर्ष दूर करण्यासाठी शासनस्तरावर बैठक घेऊन निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी दिले.


ठाणे : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ठाणे : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट Reviewed by ANN news network on १०/१६/२०२२ ०९:३७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".