ठाण्यातील श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व संत संमेलनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

 

ठाणे : गीतेचे ज्ञान विश्वात मानवता निर्माण करण्याचे काम करीत आहे. त्यामुळे हे सरकार भगवद् गीतेच्या ज्ञानाला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम करेल, असे प्रतिपादन उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. 

श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ समिती व श्री शाम सरकार यांच्या वतीने ठाण्यातील घोडबंदर येथील आनंदनगरमध्ये आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ व विराट संत संमेलनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उपस्थिती लावून संत-महात्म्यांचे आशिर्वाद घेतले. जगतगुरू स्वामी वासुदेवनंद सरस्वती महाराज, यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन पार पडले. केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार निरंजन डावखरे, गणपत गायकवाड, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, तहसीलदार युवराज बांगर, आयोजक श्वेता शालिनी आदी उपस्थित होते. वैदेही शंकराचार्य, योगी यतींद्रनंद महाराज, वल्लभदास महाराज, स्वामी चितरंजनदास, महामंडलेश्वर नवलकिशोर दास, भागवत कथाकार देवकीनंदन ठाकूर आदी संत मंडळी यावेळी उपस्थित होती. संतांच्या हस्ते फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. 

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, जेव्हा जेव्हा संस्कार समाप्त होतात तेव्हा संस्कृती समाप्त होते आणि जेव्हा संस्कृती संपते तेव्हा सभ्यता लोप पावते. मात्र, संतांनी संस्कार व संस्कृतीला लोप पावू दिले नाही. म्हणून आमची सभ्यता जिवंत आहे. विश्वात सर्वात पुरातन ही सनातन संस्कृती, हिंदू धर्म आहे. या संतांकडून आमचे मन शुध्द केले जात आहे. 

संस्कृति जपण्यासाठी मंदिराना पुन्हा जोडण्याचे काम महाराष्ट्राच्या कन्या अहिल्या देवी होळकर यांनी केले. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद मोदी हे काम करत आहेत, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

ठाण्यातील श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व संत संमेलनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट ठाण्यातील श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व संत संमेलनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट Reviewed by ANN news network on १०/१६/२०२२ ०८:५६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".