ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १५८ पैकी बिनविरोध सोडून उर्वरित १३४ ग्रामपंचायतीसाठी आज शांततेत व सुरळीतपणे मतदान झाले.
आज सायंकाळ पर्यंत सुमारे ७५ ते ८० टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ या तालुक्यातील १५८ ग्रामपंचायतीमधील सदस्य व काही ठिकाणी सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. त्यापैकी काही ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे उर्वरित १३४ ग्रामपंचायतीमध्ये आज मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण ४५९ मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. शहापूर तालुक्यातील काही मतदान केंद्रावर मतदानाची वेळ संपण्याच्या वेळी नागरिक रांगेत उभे होते. त्यामुळे या सर्व नागरिकांचे मतदान पार पडल्यानंतर तेथील प्रक्रिया पूर्ण झाली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात ७०.८६ टक्के मतदान झाले. एकूण २,३९,६८५ मतदारांपैकी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत १,६९,८४६ मतदानाचा हक्क बजावला.
मतदानाची अंतिम आकडेवारी अद्याप उपलब्ध झाली नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
Reviewed by ANN news network
on
१०/१६/२०२२ ०९:५६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: