पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जनसंवाद सभांमध्ये ७४ नागरिकांच्या तक्रारी

 


पिंपरी : महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज जनसंवाद सभा पार पडली. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत सुमारे ७४ नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या.  यात अग आणि ह  क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे १४, ८१८ आणि ५ नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.  .

आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. पाणी पुरवठा पुरेशा दाबाने करण्यात यावा, अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात यावीरस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने असे अतिक्रमणे काढण्यात यावेउद्यानांमध्ये लहान मुलांसाठी खेळणी बसविण्यात यावी तसेच ओपन जिम उभारण्यात यावी ड्रेनेज वाहिन्या दुरुस्त करण्यात याव्यात, रस्त्यावरील धोकादायक ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात यावी, रस्त्यांची दुरुस्ती करावी, नो पार्किंग झोनमध्ये गाड्या लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,  रस्त्यावर टाकण्यात आलेल्या राडारोड्यामुळे रहदारीस अडथळा होत असून संबंधितांना दंड आकारल्यास अशाप्रकारे राडारोडा टाकण्याचे प्रमाण कमी होईलकचरा संकलन केंद्राजवळ दुर्गंधी होणार नाही याची दक्षता घ्यावी. सोसायट्यांमध्ये उभारण्यात आलेल्या अनधिकृत पत्राशेडवर निष्कासनाची कारवाई करण्यात यावी. धोकादायक असलेले पथदिवे काढून नव्याने पथदिवे उभारावेत तसेच पथदिव्यांचे काम  लवकर पूर्ण करण्यात यावे, अशा तक्रारी आज झालेल्या जनसंवाद सभेमध्ये नागरिकांनी मांडल्या. 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जनसंवाद सभांमध्ये ७४ नागरिकांच्या तक्रारी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जनसंवाद सभांमध्ये ७४ नागरिकांच्या तक्रारी Reviewed by ANN news network on १०/०३/२०२२ ०६:५४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".