लोणावळा : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी लोकसभेत जैन समाजाबाबत केलेले आक्षेपार्ह वक्तव्य संसदेच्या आचारसंहितेला छेद देणारे असून त्यांनी संपूर्ण जैन समाजाची माफी मागावी अशी मागणी करीत भाजपा जैन प्रकोष्ठाच्यावतीनें त्यांचा निषेध करण्यात आला.
खासदार मोइत्रा यांनी सभागृहात बेजबाबदार विधान करण्याआधी भारतीय संस्कृतीचा विशेषतः जैन समाजातील चालीरितींचा थोडा अभ्यास करायला हवा होता. जैन समाज हा शाकाहारी समाज म्हणून जगभर ओळखला जातो हे सर्वश्रुत आहे.मात्र मोईत्रा यांचे विधान जैन समाजाच्या भावना, विचार आणि मूल्ये नष्ट करणारे आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. जैन समाजात प्रचंड रोषाचे वातावरण असून त्यांनी संपूर्ण जैन समाजाची माफी मागावी अन्यथा भाजपा जैन प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदन लोणावळा शहर पोलीस ठाण्यात देण्यात आले.
याशिवाय सकल जैन संघ, जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ, वर्धमान स्थानकवासी संघ यांच्यावतीने खासदार मोईत्रा यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी कॅन्सर मुक्त अभियानाचे गिरीष पारख, सकल जैन संघाचे अशोक पारख, महेंद्र कांकरिया, संतोष चोरडिया, किशोर पारख, जयेश संचेती, मयूर ओस्तवाल, जयंती ओसवाल, कांतीलाल भुरट, सुमतीलाल चोरडिया, जितेंद्र छल्लाणी, संगीता सुरट, जयश्री सुराणा, किरण ओसवाल, निर्मल जैन, आयुष कांकरिया, अजित भुरट, संजय लुंकड आदींसह जैन बांधव उपस्थित होते.
लोणावळ्यात भाजपतर्फे खासदार महुआ मोईत्रा यांचा निषेध
Reviewed by ANN news network
on
२/०९/२०२२ ०८:०९:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
२/०९/२०२२ ०८:०९:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: