चिंचवड, कर्जत रेल्वेस्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळणार, पासची सुविधाही सुरु होणार : श्रीरंग बारणे


पिंपरी :  चिंचवड आणि कर्जत रेल्वेस्थानकावर लांब पल्ल्यांच्या काही गाड्यांचा थांबा पुन्हा सुरु होणार आहे. तसेच पुणे-मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणार्‍या नागरिकांसाठी महिना, तीन महिन्याचा पास मिळण्याची सुविधा पुन्हा सुरु होणार आहे. अशी माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संबंधित अधिकार्‍यांना तशा सूचना दिल्याचे बारणे यांनी सांगितले.
या प्रश्नांसंदर्भात खासदार बारणे यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांची भेट घेतली. नागरिकांना येणार्‍या अडचणी त्यांना सांगितल्या. खासदार बारणे म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड आणि कर्जत रेल्वे स्थानकावर कोरोना काळानंतर रेल्वे गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या दोन स्थानकांवर गाड्यांना थांबा देण्याची मोठी आवश्यकता आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने नोकरीनिमित्त मुंबई, पुण्यात जातात. कोरोनानंतर चिंचवड, कर्जत रेल्वे स्थानकावर गाड्या थांबत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या दोन स्थानकांवर गाड्या थांबविण्याची विनंती बारणे यांनी केली.
त्यावर रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी संबंधित अधिकार्‍यांना बोलावून घेतले. लांब पल्ल्याच्या काही गाड्यांना चिंचवड, कर्जत स्थानकांवर थांबा देण्याचे आदेश दिले. तसेच पासची सुविधाही पुन्हा सुरु करण्याचे निर्देश दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. लांब पल्याच्या गाड्यांना थांबा मिळाल्याने नागरिकांची सोय होईल, असेही ते म्हणाले.
चिंचवड, कर्जत रेल्वेस्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळणार, पासची सुविधाही सुरु होणार : श्रीरंग बारणे चिंचवड, कर्जत रेल्वेस्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळणार, पासची सुविधाही सुरु होणार :  श्रीरंग बारणे Reviewed by ANN news network on २/०९/२०२२ ०८:१३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".