पिंपरी : कासारवाडीतील सॅन्डविक कोरोमॉन्ट या बहुराष्ट्रीय कंपनीच्या सामाजिक जबाबदारी (सीएसआर)निधीतून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दोन उद्यानात सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे बसविण्यात आली आहेत.
चिंचवड मधील सुदर्शन नगर येथील गोलांडे उद्यान आणि प्रेमलोक पार्क येथील गणेश उद्यान या दोन उद्यानांमध्ये ही संयंत्रे बसविण्यात आली शेजारीच असलेल्या नाल्यातून पाणी उचलून या संयंत्राद्वारे शुद्ध करून त्याचा वापर उद्यानातील झाडांसाठी तसेच स्वच्छतेसाठी केला जाणार आहे. मात्र, हे पाणी पिण्यासाठी वापरता येणार नाही.
नाल्यातून वाहणारे सांडपाणी पहिल्या साठवण टाकीत घेऊन ते दुसर्या टाकीत प्रक्रियेसाठी सोडले जाईल आणि तिसर्या टप्प्यात प्रक्रिया झाल्यानंतर ते उद्यानासाठी वापरले जाईल अशी माहिती महापालिकेच्या अधिकार्यांनी दिली
सॅन्डविकच्या सीएसआर फंडातून सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची उभारणी
Reviewed by ANN news network
on
२/०९/२०२२ ०८:०५:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
२/०९/२०२२ ०८:०५:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: