आळंदीतील पाणीटंचाई दूर होणार

कुरुळी जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी घेण्यास परवानगी आळंदी : भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेतील पाणी पुणे महापालिकेच्या कुरुळी येथील जलशुद्धीकरण केद्रांतून घेण्यासाठी टॅपिंग करण्यास आळंदी नगरपरिषदेला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आळंदीला पाणी मिळण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे. अशी माहिती नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी दिली. या संदर्भात पुणे महापालिकेच्या आयुक्तांना संबंधित विभागाने दिलेले पत्र पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आळंदी नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांना दिले आहे. यावेळी भाजप अध्यात्मिक विकास आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय घुंडरे, अशोक उमरगेकर, पांडुरंग ठाकुर आदी उपस्थित होते. आळंदीकर नागरिकांना शुद्ध पाणी देण्याचे आश्वासन भाजपने मागील निवडणुकीत दिले होते. ते आता पूर्ण केले जाणार आहे. टॅँपिंगचे काम जलद गतीने पूर्ण करून नियमित व पुरेशा दाबाने, शुद्ध पाणीपुरवठा आळंदीकरांना केला जाणार आहे. यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव,पाणी पुरवठा विभाग प्रमुख अक्षयकुमार शिरगिरे, पाणी पुरवठा समितीचे सर्व सभापती, नगरसेवक यांनी या विषयाचा वेळोवेळी पाठपुरावा केला असेही नगराध्यक्षा उमरगेकर यांनी सांगितले.
आळंदीतील पाणीटंचाई दूर होणार आळंदीतील पाणीटंचाई दूर होणार Reviewed by ANN news network on २/१०/२०२२ १०:३५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".