लोणावळा नगरपरिषद कर्मचार्यांचे लेखणीबंद आंदोलन

लोणवळा
: अमरावती महानगरपालिका आयुक्त प्रवीण अष्टीकर यांच्यावर शाई फेकल्याच्या घटनेच्या निषेधार्थ लोणावळा नगरपरिषद कर्मचार्यां नी गुरुवारी लेखणीबंद आंदोलन केले. अमरावती शहरातील राजापेठ अंडर बायपास उड्डाणपुलाची पाहणी करण्यास गेलेल्या महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर दोन महिलांनी शाई फेकल्याची घटना बुधवारी दुपारी 1.30 दरम्यान घडली. राजापेठ अंडर बायपास उड्डाणपुलावर युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक तथा आमदार रवि राणा यांच्या नेतृत्त्वात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा 12 जानेवारी रोजी बसविण्यात आला होता. मात्र, तो प्रशासनाने रात्रीतून उचलल्याने वाद विकोपाला गेला. त्याच अनुषंगाने काही महिलांनी महापालिका आयुक्तांवर शाई फेकल्याची ही घटना घडल्याची चर्चा होत आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटना, त्यांच्या सर्व शाखा आणि सर्व जिल्ह्यातील कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून लेखनी बंद आंदोलन पुकारले होते. लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांलनी या आंदोलनात सहभागी होत निषेधाच्या घोषणा दिल्या.
लोणावळा नगरपरिषद कर्मचार्यांचे लेखणीबंद आंदोलन लोणावळा नगरपरिषद कर्मचार्यांचे लेखणीबंद आंदोलन Reviewed by ANN news network on २/१०/२०२२ १०:३२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".