भोसरीचा विकास परिपूर्ण शहर म्हणून करणार

नितीन लांडगे यांची ग्वाही
पिंपरी : भोसरीतील सर्व सामान्य नागरीकांचा सर्वांगिण विकास करायचा हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची 2017 ची निवडणूक मी लढलो. मतदारांनी मला सेवा करण्याची संधी दिली. त्यावेळच्या माझ्या जाहिरनाम्यातील बहुतांश सर्व विकासकामे पूर्ण झाली आहेत. आता भोसरीचा विकास परिपूुर्ण शहर म्हणून करायचा आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष अॅमड. नितीन लांडगे यांनी केले. भोसरी सर्व्हे क्र. 1 येथे शंभर बेडचे नविन भोसरी रुग्णालय उभारण्यात आले आहे. हे रुग्णालय गुरुवारपासून पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी लांडगे यांनी भेट दिली. यावेळी तेथील डोक्टर्स आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना लांडगे यांनी सांगितले की, शंभर बेडच्या या नवीन भोसरी रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यामध्ये ऑक्सिजनयुक्त 90 बेड स्त्री रोग प्रसुती विभाग व जनरल आणि 10 बेड आयसीयू आहेत. तसेच तीन मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर आणि चोविस तास दोन रुग्णवाहिकेसह तातडीची सेवा उपलब्ध आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत जन्म मृत्यू नोंदणी विभाग आणि चोविस तास स्मशानभूमी दाखला देण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच भोसरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पै. मारुतराव लांडगे कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. लवकरच त्याचा आणि संत ज्ञानेश्वर भाजी मंडईचा लोकार्पण सोहळा होणार आहे.भोसरी सहल केंद्राशेजारी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय, कै. अंकुशराव लांडगे सभागृहाच्या मागे एसटीपी मंजूर करण्यात आला आहे. भोसरीमध्ये इंग्रजी माध्यमाची मनपाची सुसज्ज शाळा उभारण्याचेही काम सुरु आहे. पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यालगत असणार्याु फळ विक्रेत्यांसाठी पुणे नाशिक महामार्गावरील उड्डाणपुलाखाली जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यालगतच्या परिसराचे सुशोभिकरण करण्याचे नियोजन आहे. हे सर्व विकास प्रकल्प पुर्ण करण्यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि भाजपाचे माजी शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांचे मार्गदर्शन लाभले आहे अशीही माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष अॅ्ड. नितीन लांडगे यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली.
भोसरीचा विकास परिपूर्ण शहर म्हणून करणार भोसरीचा विकास परिपूर्ण शहर म्हणून करणार Reviewed by ANN news network on २/१०/२०२२ १०:३७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".