लोणावळा : राजमाची किल्ल्यालगतच्या ढाक बहिरीच्या सुळक्यावरुन पडून शनिवारी दुपारी एका गिर्यारोहकाचा मृत्यू झाला.
प्रतिक आवळे (रा. औरंगाबाद) असे या गिर्यारोहकाचे नाव आहे. ढाक बहिरी हा कर्जत व मावळ तालुक्याच्या मध्यावर असलेला उंच सुळका आहे. अनेक जण याठिकाणी ट्रेकिंगसाठी जात असतात. शनिवारी सकाळी प्रतिक आवळे, पंकज गावदाडे, सुजित लहाने, अभिषेक शेजूळ, सागर जैस्वाल हे औरंगाबाद हून आलेले 5 जण ट्रेकसाठी गेले होते. त्यातील प्रतिक आवळे ह्याचा तोल गेल्याने खाली पडून त्याचा मृत्यू झाला.
शनिवारी दुपारी 3.30 च्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी त्याठिकाणी ट्रेकिंगसाठी आलेल्या तुषार महाडिक व भारत रायकर या दोघांनी ही घटना बघितली. त्यांनी मृत प्रतिक आवळे व इतर चारजणांना व्यवस्थित जागेवर घेतले. या घटनेची माहिती समजताच संतोष दगडे व त्यांची टीम कर्जत तसेच स्थानिक गावकरी लगेच ढाक बहिरी जवळ पोहोचले तसेच यशवंती हायकर्स, खोपोलीची टीम साहित्यासह ढाकच्या डोंगरावर पोहोचली. साधारणतः सायंकाळी 6.30 वाजल्यापासून प्रतिकचे शव व त्याचे सहकारी यांना कर्जत मधील सांडशी गावाच्या वाटेने खाली आणण्याचे प्रयत्न चालू झाले. काळोख आणि पायवाट तसेच डोंगर उतार व कड्याच्या बाजूची अरुंद जागा यातून सर्व ट्रेकर्स टीम व गावकरी यांनी प्रतिकचा मृतदेह व इतर चौघांना खाली सांडशी गावात रात्री 3.30 वाजता पोहोचवले व तिथून पुढे त्यांना कर्जतला पोहोचवण्यात आले.
ढाक बहिरीच्या सुळक्यावरुन पडून एका गिर्यारोहकाचा मृत्यू
Reviewed by ANN
on
२/०६/२०२२ १०:१७:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: