लता मंगेशकर यांना महापालिकेतर्फे आदरांजली



पिंपरी :  भारतरत्न लता मंगेशकर या भारतातील एक महान आणि सर्वोच्च प्रतिभाशाली गायिका होत्या. मराठी, हिंदी तसेच अनेक भाषांतील त्यांनी गायलेली हजारो गीते मंत्रमुग्ध करणारी आणि त्यांची आठवण सदैव जागृत करणारी ठरतील अशा शब्दात महापौर माई  ढोरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य इमारतीमधील भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रतिमेस महापौरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे उपस्थित होते.
महापौर म्हणाल्या; लतादीदींनी भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केलेली होती. त्यात प्रामुख्याने हिंदी आणि मराठी गाण्यांचा समावेश होता. त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार तर देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. असे सांगून देश विदेशात लोकप्रिय असलेल्या लतादिदींच्या जाण्यामुळे संगीत क्षेत्रात कधी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

लता मंगेशकर यांना महापालिकेतर्फे आदरांजली  लता मंगेशकर यांना महापालिकेतर्फे आदरांजली Reviewed by ANN on २/०७/२०२२ ०९:४५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".