पिंपरी : ठेकेदाराकडून साफसफाई करणार्या कर्मचार्यांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप करत सफाई कर्मचार्यांनी महापालिकेसमोर आंदोलन केले.
कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी बळीराम काकडे, मधुरा डांगे, मालर्न गवई, गौरी सेलर आदी उपस्थित होते.
पालिकेच्या वतीने 1 हजार 600 कामगार रस्ते झाडलोट, साफसफाई व इतर कामे कंत्राटी पद्धतीने करत आहेत. गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून ही कामे सातत्याने सुरू आहेत. यात ठेकेदार बदलत असून मूळ कामगार मात्र तेच आहेत. नवीन ठेकेदार पद्धतीमुळे कामगारांचे शोषण व आर्थिक पिळवणूक होत आहे. असे बाबा कांबळे म्हणाले.
सफाई कर्मचार्यांचे आंदोलन
Reviewed by ANN news network
on
२/०९/२०२२ ०८:०१:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
२/०९/२०२२ ०८:०१:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: