शिवजयंती आयोजनासाठी महापालिकेत बैठक


पिंपरी :  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पालिकेच्या वतीने यावर्षी उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे, असे महापौर माई ढोरे यांनी सांगितले.  शासनाच्या नियमावलीचे पालन करून कार्यक्रम साजरे करण्यासाठी महापालिका नियोजन करेल असेही त्या म्हणाल्या.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महानगरपालिकेच्या वतीने विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात येत असते.  त्या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी महापालिका पदाधिकारी, अधिकारी तसेच शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत आज महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये महापौर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
या बैठकीस उपमहापौर हिराबाई घुले, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, मारुती भापकर, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, विलास देसले, उपअभियंता संजय खरात, जीवन बोराडे, अजय पाताडे,  जे. सी. यादव, सतिश काळे, मारुती लोखंडे, धनाजी येळकर पाटील, अभिषेक म्हसे,  गणेश सरकटे, अभिजीत पाटील, दादासाहेब पाटील, सागर तापकीर, अतुल वर्पे, निलेश शिंदे, सुरेंद्र पासलकर आदी उपस्थित होते.
शिवजयंती आयोजनासाठी महापालिकेत बैठक शिवजयंती आयोजनासाठी महापालिकेत बैठक Reviewed by ANN news network on २/०९/२०२२ ०८:०३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".