सिद्धिविनायकनगरीचा पाणी प्रश्न मार्गी लागणार - श्रीरंग बारणे




पिंपरी  -   देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या हद्दीत येत असलेल्या सिद्धिविनायनगरीचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. पाण्याची पाईपलाइन टाकण्यासाठी पुढील दीड महिन्यात संरक्षण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळेल. त्यामुळे कामाला गती येईल. कामासाठी राज्य सरकारने 5 कोटी 55 हजार रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या हद्दीत सिद्धिविनायकनगरी येत आहे. सिद्धिविनायकनगरीचा पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नागरिकांचे हाल होत आहेत. पाण्याची पाईपलाइन टाकण्यासाठी संरक्षण विभागाची परवानगी तत्काळ मिळावी यासाठी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी संरक्षण विभागाचे महानिदेशक अजयकुमार शर्मा यांची भेट घेतली. परवानगी देण्याची मागणी केली. त्यावर पुढील दीड महिन्यात सर्व प्रक्रिया करुन एनओसी देण्याचे आश्वासन शर्मा यांनी दिले.

खासदार बारणे म्हणाले, सिद्धिविनायकनगरी देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या हद्दीत येते. भौगोलिकदृष्ट्या महापालिकेच्या जवळ आहे. या नगरीला पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. यामुळे स्वतंत्र पाण्याची पाइपलाईन टाकण्यात येणार आहे. पाईपलाईन टाकण्याकरिता  संरक्षण विभागाकडून ना-हरकत (एनओसी) आवश्यक आहे. याबाबतची फाईल संरक्षण विभागाचे महानिदेशक अजयकुमार शर्मा यांच्याकडे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याला मान्यता मिळत नव्हती.

पाईपलाईनसाठी महाराष्ट्र सरकारने 5 कोटी 55 हजार रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या कामाला संरक्षण विभागाची मान्यता मिळाली. तर, काम तत्काळ मार्गी लागू शकते. त्यावर पुढील दीड महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण करुन एनओसी देण्याचे आश्वासन शर्मा यांनी दिले. परवानगी मिळताच तत्काळ पाईपलाइनचे काम हाती घेण्यात येईल. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सिद्धिविनायकनगरीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

सिद्धिविनायकनगरीचा पाणी प्रश्न मार्गी लागणार - श्रीरंग बारणे सिद्धिविनायकनगरीचा  पाणी प्रश्न मार्गी लागणार - श्रीरंग बारणे Reviewed by ANN on २/०८/२०२२ ०९:५८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".