आळंदी: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि नगर परिषद आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ‘राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
आळंदी येथे इंद्रायणी घाटावरील रक्षा विसर्जन स्तंभ येथेसकाळी साडेआठ वाजता हा कार्यक्रम झाला.
महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर, त्यांच्या अस्थी, रक्षेचे भारतातील प्रमुख नद्यांमध्ये विसर्जन झाले. त्यातील एका कलशातील अस्थींचेे विसर्जन आळंदी येथील इंद्रायणी नदीमधे दि. 12 फेब्रुवारी 1948 रोजी करण्यात आले होते. त्याची स्मृती म्हणून रक्षा विसर्जन स्तंभ उभारण्यात आला. दरवर्षी 12 फेब्रुवारी रोजी आळंदी येथे गांधीजींना अभिवादन करण्यात येते. गेल्या 74 वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे.
यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम झाला. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, सचिव अन्वर राजन, विश्वस्त डॉ. मच्छिंद्र गोर्डे, डॉ. उर्मिला सप्तर्षी, डॉ. प्रवीण सप्तर्षी, हभप श्यामसुंदर महाराज, आळंदी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे, देवराम घुंडरे, मुख्याधिकारी अंकुश जाधव, गणपतराव कुर्हाडे, तुषार झरेकर, सचिन चव्हाण, संस्थेचे कर्मचारी, शांतीदलाचे आणि युक्रांदचे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
डॉ कुमार सप्तर्षी यांचे हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सौ. मोहिनी पवार, अभय देशपांडे यांचा सर्वधर्म प्रार्थना आणि भजने गायनाचा कार्यक्रम झाला.
आळंदीत महात्मा गांधी यांचे पुण्यस्मरण
Reviewed by ANN
on
२/१३/२०२२ १०:१८:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: