चिखली,पाटीलनगर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार

चिखली : चिखलीतील पाटीलनगर परिसरात असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राशेजारी नवीन पाण्याची टाकी बांधली जाणार असून चिखली ते डुडुळगाव नवीन जलवाहिनी टाकली जाणार आहे. या कामांचे भूमिपूजन भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, अंकुश मळेकर, जितेंद्र यादव, संदीप शेलार, विनायक मोरे, गणेश मळेकर, आनंदा यादव, कपिल म्हेत्रे, दिनेश यादव, सदानंद बग, उपअभियंता सयाजी गायकवाड, दीपक जाधव, तुषार हजारे, अभिषेक हरगुडे, संकेत मळेकर, राजू ढोरे, अमृत सोनवणे, पांडुरंग साने, यशवंत साने, गीतराम मोरे, सुनील लोखंडे, संतोष मोरे, नवनाथ भोसले, संतोष भांगरे, जालिंदर मोरे, खंडू मोरे, विष्णू नेवाळे, पांडुरंग मोरे, संतोष मोरे उपस्थित होते. स्थानिक नगरसेवक व ’फ’ प्रभाग समितीचे अध्यक्ष कुंदन गायकवाड आणि नगरसेविका स्वीनल म्हेत्रे, साधना मळेकर यांच्या प्रयत्नाने ही टाकी उभारली जात आहे. नागरिकांना रस्ते वीज पाणी या मूलभूत सुविधा परिपूर्णपणे देणे आपली जबाबदारी आहे. त्यासाठी प्रयत्नशील असने हे खर्या् अर्थाने कोणत्याही लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. या कर्तव्याची जाणीव ठेवत नगरसेवक कुंदन गायकवाड हे कार्यरत आहेत, अशा शब्दात आमदार लांडगे यांनी गायकवाड यांचे कौतुक केले. या नवीन जलकुंभामुळे उन्हाळ्यात पाण्याची चणचण नागरिकांना भासणार नाही. चिखली व पाटिलनगर परिसरात नवीन जलसाठा होणारी ही पाण्याची टाकी कामाचे समाधान देणारी आहे, अशा भावना नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी व्यक्त केल्या.
चिखली,पाटीलनगर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार चिखली,पाटीलनगर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार Reviewed by ANN news network on २/१४/२०२२ १०:२०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".