आम आदमी पार्टीची प्रचाराला सुरुवात



भोसरी, कासारवाडी येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
पिंपरी : आम आदमी पार्टीच्या भोसरी आणि कासारवाडी येथील जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन आपचे राज्य संघटनमंत्री विजय कुंभार यांच्या हस्ते 5 फेब्रुवारी रोजी करण्यात आले.
निवडणूक आयोगाने पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूकीसाठी प्रभाग रचना जाहीर केल्याबरोबर सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आम आदमी पार्टीनेही यामध्ये आघाडी घेत 5 फेब्रुवारी रोजी काळभोरनगर येथील हनुमान पुतळा येथे प्रचाराचा नारळ फोडला.
यानंतर सायंकाळी 4 वाजता भोसरी गावठाण येथे आपचे भोसरी विधानसभा उपाध्यक्ष मंगेश आंबेकर यांच्या आणि कासारवाडी विभाग अध्यक्ष मोतीराम अगरवाल याच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन आपचे राज्य संघटक विजय कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आपचे पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत आणि पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आम आदमी पार्टीची प्रचाराला सुरुवात  आम आदमी पार्टीची प्रचाराला सुरुवात Reviewed by ANN on २/०६/२०२२ १०:०५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".