तळेगाव दाभाडे शहरातील विकासकामांची आमदार शेळके यांनी केली पाहणी



तळेगाव दाभाडे : मावळचे आमदार सुनील शेळके यांनी तळेगाव दाभाडे शहरातील विविध विकासकामांची नुकतीच पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे, सुदर्शन खांडगे, नखील भगत, कृष्णा कारके, सुरेश धोत्रे,संदीप शेळके, अशोक भेगडे, अनिकेत भेगडे,आशिष खांडगे आदी उपस्थित होते.
आमदार शेळके यांनी या दौर्‍यात स्टेशनभागासह यशवंतनगर, वतननगर, राजगुरव कॉलनी, स्वराजनगरी, म्हाळस्कर वाडी, हरणेश्वर कॉलनी तसेच महावितरणकडे जाणारा रस्ता, भुयारी गटारे, पाणी योजना या कामांची पाहणी केली. ही सर्व कामे होत असताना कामांचा दर्जा उत्कृष्ट असावा,अशा ठेकेदारांना सूचना दिल्या आहेत. स्टेशन भागाला पाणी पुरवठा होत असलेल्या इंद्रायणी नदीवरील जॅकवेलचीही त्यांनी  पाहणी केली.
दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत असून जॅकवेलच्या जवळच सांडपाणी सोडण्यात येत असल्याने या भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे.त्यामुळे भविष्यात आंद्रा धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याचा विचार सुरू आहे. तळेगाव चाकण रस्त्यावरील वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी रस्ता रुंदीकरणाच्या कामाचा वेग वाढविण्याच्या सूचनाशेळके यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

तळेगाव दाभाडे शहरातील विकासकामांची आमदार शेळके यांनी केली पाहणी  तळेगाव दाभाडे शहरातील विकासकामांची आमदार शेळके यांनी केली पाहणी Reviewed by ANN on २/०६/२०२२ १०:०९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".