भारत बंदमध्ये सर्व कामगार व शेतकर्यांमनी सहभागी व्हावे; कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे आवाहन

पिंपरी : भाजपाचे केंद्र सरकार मागील सात वर्षांपासून कामगार क्षेत्रात अस्थिरता निर्माण करुन भांडवलदारांना पूुरक ठरतील असे निर्णय घेत आहे. शेतकरी व कामगारांचे आर्थिक शोषण करुन देशातील गोरगरीब जनतेला भांडवलदारांचे गुलाम बनविण्याचे धोरण मोदी सरकारचे आहे. संघटीत व असंघटीत अशा सर्व क्षेत्रातील कामगारांना जाचक ठरतील असे चार कामगार कायदे केंद्र सरकार करीत आहे. हे प्रस्तावित कामगार कायदे कायमस्वरुपी रद्द करावेत या मागणीसाठी देशभरातील सर्व कामगार संघटनांनी 23 आणि 24 फेब्रुवारी 2022 ला भारत बंदचा नारा दिला आहे. पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीसह जिल्ह्यातील औद्योगिक पट्यांतील देखील हे दोन दिवस सर्व कारखाने, आस्थापना बंद ठेवून नागरीकांनी भारत बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कामगार संघटना कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. गुरुवारी आकुर्डीतील श्रमशक्ती भवन येथे कामगार संघटना कृती समितीच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम यांचा काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबदल मानव कांबळे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक मारुती भापकर, कामगार नेत्या लता भिसे, वसंत पवार, गणेश दराडे, अरविंद जगताप, निरज कडू, अनिल रोहम, दिलीप काकडे, एस. पी. शिवकुमार, एम. आर. सचिन, विशाल भेलकर, सुभाष कालकुंद्रीकर, मोहन पोटे आदी उपस्थित होते.
भारत बंदमध्ये सर्व कामगार व शेतकर्यांमनी सहभागी व्हावे; कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे आवाहन भारत बंदमध्ये सर्व कामगार व शेतकर्यांमनी सहभागी व्हावे; कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे आवाहन Reviewed by ANN news network on १२/३०/२०२१ १०:०७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".