औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाची धडक मोहीम; अतिक्रमणे निष्कासित


पुणे: औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि फ्रंट मार्जिनवरील एकूण ३० हजार २०० चौरस फूट अनधिकृत अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठी मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी धडक मोहीम राबविण्यात आली. अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर, परिमंडळ क्र. २ चे उपायुक्त अविनाश सपकाळ आणि औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त इंद्रायणी करचे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, या मोहिमेदरम्यान औंध रस्ता खडकी आणि भाऊ पाटील रस्ता बोपोडी परिसरातील रस्ते व पदपथांवरील अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यात आली. संबंधित ठिकाणी अनधिकृत व्यावसायिक स्टॉल, काउंटर आणि इतर साहित्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता, तसेच पादचाऱ्यांना ये-जा करताना अडचणी येत होत्या. सार्वजनिक वाहतूक सुरळीत करणे, पदपथ मोकळे करणे आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्याच्या उद्देशाने ही कारवाई राबविण्यात आली.

कारवाईदरम्यान ७३ शेड, ०९ स्टॉल आणि ७३ कच्ची-पक्की बांधकामे निष्कासित करण्यात आली. याशिवाय दुकानांबाहेर अनधिकृतपणे लावण्यात आलेले बोर्ड, बॅनर व इतर जाहिरात साहित्यही हटविण्यात आले असून, जप्त केलेले साहित्य औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या महापालिका गोडाऊनमध्ये जमा करण्यात आले आहे.

बांधकाम विकास विभाग, झोन क्र. ०६ यांच्यामार्फत औंध रस्ता खडकी व भाऊ पाटील रस्ता बोपोडी भागातील फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत कच्च्या व पक्क्या बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करत एकूण ३० हजार २०० चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. या मोहिमेसाठी उप अभियंता, विभागीय अतिक्रमण अधिकारी, क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक, परवाना निरीक्षक, ०२ कनिष्ठ अभियंता, ०७ अतिक्रमण निरीक्षक, ०५ मनपा पोलीस, १७ एमएसएफ जवान, ३७ बिगारी सेवक तसेच ०४ जेसीबी, ०२ गॅस कटर आणि ०२ ओपन ट्रक उपलब्ध होते.

  • Labels: PMC Encroachment Drive, Aundh Baner Pune, Khadki Bopodi News, Pune Municipal Corporation, Illegal Construction Action, Pune News

  • Search Description: Pune Municipal Corporation's Aundh-Baner ward office conducts a drive to clear 30,200 sq. ft. of unauthorized encroachments along roads, footpaths, and front margins in Khadki and Bopodi.

  • Hashtags: #PuneNews #PMC #AundhBaner #Khadki #Bopodi #EncroachmentDrive #MarathiNews

औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाची धडक मोहीम; अतिक्रमणे निष्कासित औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाची धडक मोहीम; अतिक्रमणे निष्कासित Reviewed by ANN news network on ११/२६/२०२६ ०९:३६:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".