पुण्यातील मोकळ्या जागा, दुकाने आणि फेरीवाल्यांच्या परिसरातील कचऱ्यावर महापालिकेची कठोर दंडात्मक कारवाई; दुकाने सील व परवाने रद्द करण्याचा इशारा


पुणे: पुणे महानगरपालिका हद्दीतील खाजगी मोकळ्या जागा, व्यावसायिक दुकाने, आस्थापने तसेच फेरीवाले झोन आणि मंडई परिसरात आढळून येणाऱ्या कचऱ्याविरोधात महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कठोर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम २०१६ तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील संबंधित तरतुदींनुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून ही कारवाई राबवली जाणार असल्याचे उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खाजगी मोकळ्या जागांवर कचरा साठल्यास त्याची जबाबदारी संबंधित जागा मालकाची राहील. महापालिकेचे सहायक आयुक्त नोटीस देऊन जागा मालकाला कचरा उचलून जागा स्वच्छ करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देतील. या कालावधीत कचरा साफ करून नवीन पत्र्याचे कंपाऊंड घालून जागा बंदिस्त करणे बंधनकारक राहील. मुदतीत काम न झाल्यास मनुष्यबळ, साहित्य आणि मशिनरीचा खर्च जागा मालकाकडून वसूल केला जाईल; तसेच ही रक्कम न भरल्यास मालमत्ता करात समाविष्ट केली जाईल. साफसफाई केलेल्या मोकळ्या जागांचे आधीचे व नंतरचे जिओ-टॅग केलेले छायाचित्रे क्षेत्रीय कार्यालयांकडून जतन करण्यात येणार आहेत.

व्यावसायिक दुकाने आणि आस्थापनांसमोरील भागाची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी मालक किंवा भाडेकरूची असेल. अस्वच्छता आढळल्यास सहायक आयुक्तांच्या सूचनेनुसार जागा स्वच्छ करण्यासाठी एक दिवसाची मुदत दिली जाईल. त्या मुदतीत कार्यवाही न झाल्यास पहिल्या वेळी १० हजार रुपये, दुसऱ्या वेळी २० हजार रुपये, तिसऱ्या वेळी ५० हजार रुपये आणि चौथ्या वेळी एक लाख रुपये दंड आकारला जाईल, तर पाचव्या वेळी संबंधित दुकान किंवा आस्थापना सील करण्यात येईल.

फेरीवाले झोन आणि मंडईतील फेरीवाल्यांनी आपल्यासमोरील जागा स्वच्छ ठेवणे तसेच ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यासाठी दोन कचराकुंड्यांची (बिन्स) व्यवस्था करणे अनिवार्य असेल. या नियमांचे उल्लंघन झाल्यास पहिल्या वेळी १० हजार रुपये, दुसऱ्या वेळी २० हजार रुपये, तिसऱ्या वेळी ५० हजार रुपये आणि चौथ्या वेळी एक लाख रुपये दंड आकारण्यात येईल, तर पाचव्या वेळी फेरीवाल्याचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल.


  • Labels: Pune Municipal Corporation, PMC Action, Solid Waste Management, Garbage Fine Pune, Street Vendors Pune, Pune News

  • Search Description: Pune Municipal Corporation announces strict penalty action against garbage on open plots, commercial shops, and hawker zones, with fines up to Rs 1 lakh, shop sealing, and license cancellation.

  • Hashtags: #PuneNews #PMC #PuneMunicipalCorporation #SolidWasteManagement #SwachhPune #MarathiNews

पुण्यातील मोकळ्या जागा, दुकाने आणि फेरीवाल्यांच्या परिसरातील कचऱ्यावर महापालिकेची कठोर दंडात्मक कारवाई; दुकाने सील व परवाने रद्द करण्याचा इशारा पुण्यातील मोकळ्या जागा, दुकाने आणि फेरीवाल्यांच्या परिसरातील कचऱ्यावर महापालिकेची कठोर दंडात्मक कारवाई; दुकाने सील व परवाने रद्द करण्याचा इशारा Reviewed by ANN news network on ११/२६/२०२६ ०९:२९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".