पुणे: महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सत्यशोधक रॅली आणि अभिरूप सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे महापालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऐतिहासिक भिडे वाड्यापासून दुपारी दोन वाजता संविधान प्रतीस पुष्पहार अर्पण करून सत्यशोधक रॅलीला सुरुवात होणार असून, महात्मा फुले यांच्या वेशातील कलाकार पारंपरिक बग्गीतून यात सहभागी होणार आहेत. भिडे वाडा येथून अप्पा बळवंत चौक मार्गे ही रॅली पुणे महानगरपालिकेत पोहोचेल.
महापालिका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी चार वाजता महापालिकेच्या नवीन सभागृहात अभिरूप सभेला प्रारंभ होईल.
या वेळी महापालिकेतील सर्व पक्षांचे गटनेते, नगरसेवक, पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत, तसेच प्रेक्षक गॅलरीत काही निमंत्रित नागरिकांनाही सभेला उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला आयोजित या सत्यशोधक रॅली आणि अभिरूप सभेमुळे त्यांच्या विचारांचा जागर पुणे शहरात होणार असून, पुणे महानगरपालिकेतील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी व चवदार तळे शताब्दी वर्ष कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे.
Labels: Pune Municipal Corporation, Satyashodhak Rally Pune, Mahatma Jyotirao Phule, Parshuram Wadekar, Bhide Wada Pune, Pune News
Search Description: Pune Municipal Corporation organizes a Satyashodhak Rally from Bhide Wada to PMC and a mock session on November 27, 2026, marking Mahatma Jyotirao Phule's birth bicentenary year.
Hashtags: #PuneNews #PMC #MahatmaPhule #BhideWada #SatyashodhakRally #PuneMunicipalCorporation #MarathiNews
उद्या भिडे वाड्यापासून पुणे महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभेचे आयोजन
Reviewed by ANN news network
on
११/२६/२०२६ ०९:४६:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/२६/२०२६ ०९:४६:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: