पुणे : 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची १२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्याचा सायबर भामट्यांचा डाव येरवडा पोलिसांच्या सायबर पथकाने उधळून लावला आहे. पोलिसांच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे तक्रारदाराचे सर्व पैसे सुरक्षित राहिले आहेत.
दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी फिर्यादीस एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. समोरील व्यक्तीने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगत, "तुमचे एटीएम कार्ड नरेश गोयल नावाच्या आरोपीकडे सापडले असून तुमच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. अटक टाळायची असेल तर बँक खाते, एफडी आणि पासवर्डची माहिती द्या," अशी धमकी दिली.
घाबरलेल्या नागरिकाने आपल्या बँकांची माहिती दिली, परंतु काही वेळातच आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी येरवडा पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाशी संपर्क साधला. प्रकरण गांभीर्याने घेत सायबर टीमने त्वरित संबंधित बँकांशी संपर्क साधून तक्रारदाराचे खाते ब्लॉक केले. त्यामुळे खात्यातील सर्व १२.५० लाख रुपये सुरक्षित राहिले.
ही कामगिरी अपर आयुक्त मनोज पाटील, उपआयुक्त चिलुमुला रजनीकांत, सहाय्यक आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक उमेश गित्ते, निरीक्षक (गुन्हे) शारदा कोकाटे व केशव दिंडे, उपनिरीक्षक गणेश राठोड आणि अंमलदार समीर पिलाने, मनोज भागवत, स्वप्निल पिंगळे, रोहिणी भोकसे व मीनाक्षी कापडे यांनी केली.
Labels: Yerwada Police, Digital Arrest, Cyber Fraud, Pune Police, Cyber Awareness
Search Description: Yerwada Police Cyber Team saves Rs 12.50 lakh of a citizen targeted in a Digital Arrest scam.
Hashtags: #DigitalArrestScam #YerwadaPolice #PunePolice #CyberSecurity #1930Helpline
'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून १२.५० लाखांना गंडा घालण्याचा प्रयत्न
Reviewed by ANN news network
on
१०/१०/२०२६ ०५:४०:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/१०/२०२६ ०५:४०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: