सायबर भामट्यांनी उडवलेले ३ लाख रुपये बाणेर पोलिसांकडून रिकव्हर; 'MRM' पोर्टलद्वारे नागरिकाला मोठा दिलासा
पुणे : ऑनलाइन पॉलिसीच्या रकमेचे आमिष दाखवून एका नागरिकाची ६ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यांविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्याच्या सायबर तपास पथकाने यशस्वी कारवाई केली आहे. केंद्र सरकारच्या एमआरएम (Money Restoration Module) पोर्टलचा प्रभावी वापर करून पोलिसांनी ३,०३,५४० रुपये फिर्यादीस परत मिळवून दिले आहेत.
बाणेर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या तक्रारीनुसार (NCCRP Ack. No. 31908250137365), सायबर गुन्हेगारांनी तक्रारदारास पॉलिसीच्या पैशांचे आमिष दाखवून दिशाभूल केली होती. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून एकूण ६,७०,२९८ रुपये इतर खात्यांवर वर्ग करून आर्थिक फसवणूक केली.
घटनेची माहिती मिळताच बाणेर सायबर पथकाने 'गोल्डन आवर' (Golden Hour) चा वापर करून तातडीने तांत्रिक तपास सुरू केला. बँका आणि वित्तीय संस्थांशी फोन व ईमेलद्वारे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. तपासादरम्यान केंद्र सरकारच्या 'MRM' पोर्टलवर तातडीने अर्ज करून संबंधित बँक खात्यांमधील फसवणुकीची रक्कम होल्ड (Hold/Lien) करण्यात आली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ३,०३,५४० रुपये फिर्यादीच्या खात्यात पुन्हा यशस्वीरीत्या जमा करण्यात पोलिसांना यश आले.
ही कामगिरी अपर आयुक्त मनोज पाटील, उपआयुक्त चिलुमुला रजनीकांत, सहाय्यक आयुक्त ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत, निरीक्षक (गुन्हे) विजय खिल्लारे, सहाय्यक निरीक्षक नंदकुमार कदम, सहाय्यक फौजदार शिंदे, अंमलदार दत्ता काळे, योगिता मिसाळ आणि सायबर पथकाने केली.
Labels: Baner Police, Cyber Crime, Financial Fraud, MRM Portal, Pune Cyber Cell
Search Description: Baner Police Cyber Cell successfully recovers Rs 3.03 lakh using MRM portal after online insurance fraud.
Hashtags: #CyberCrime #BanerPolice #PuneCyberCell #MoneyRestoration #CyberAwareness
सायबर भामट्यांनी उडवलेले ३ लाख रुपये बाणेर पोलिसांकडून रिकव्हर; 'MRM' पोर्टलद्वारे नागरिकाला मोठा दिलासा
Reviewed by ANN news network
on
१०/१०/२०२६ ०५:२८:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/१०/२०२६ ०५:२८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: