पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एनडीपीएस (NDPS) म्हणजेच अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीला जेरबंद करण्यात पुणे गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ ला यश आले आहे. तौसिफ उर्फ 'चुहा' जमीर सय्यद (वय २९, रा. संतोषा नगर, कात्रज, पुणे) असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.
माहितीनुसार, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार रेकॉर्डवरील फरार आरोपींचा शोध घेत होते. यादरम्यान, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ६१३/२०२४ एनडीपीएस ॲक्ट कलम ८ (क), २२ (ब), २९ मधील पाहिजे असलेला आरोपी तौसिफ उर्फ 'चुहा' हा लष्करात (कॅम्प परिसर) येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस अंमलदार अमित गद्रे यांना मिळाली.
माहितीची खात्री पटल्यानंतर उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, अंमलदार बाळू गायकवाड, ज्ञानेश्वर पिंगळे, अमित गद्रे व साधना पवार यांच्या पथकाने लष्कर पोलीस ठाण्याजवळ सापळा रचला. दुपारी १६:०४ वाजता आरोपीस ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहाय्यक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मारुती खेडकर आणि तपास पथकाने केली.
Labels: Pune Crime Branch, NDPS Case, Katraj News, Pune Crime, Arrest
Search Description: Anti-Dacoity and Anti-Vehicle Theft Squad 1 arrests wanted NDPS accused Tausif alias Chuha Sayyad in Camp area Pune.
Hashtags: #PuneCrimeBranch #NDPS #PuneNews #PoliceAction #CrimeNews
एनडीपीएस गुन्ह्यातील सराईत फरार आरोपी 'उंदीर'ला गुन्हे शाखेकडून बेड्या
Reviewed by ANN news network
on
१०/१०/२०२६ ०५:५३:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/१०/२०२६ ०५:५३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: