पुणे : हडपसर परिसरातील एका मोबाईल शॉपीमध्ये काम करण्याच्या बहाण्याने येऊन ग्राहकांचे महागडे मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला हडपसर पोलिसांनी अमरावती येथून जेरबंद केले आहे. संकेत रामराम राठोड (वय २८, मूळ रा. वाकज, ता. महागाव, जि. यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरी गेलेले ७५ हजार रुपये किमतीचे सॅमसंग कंपनीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपी संकेत राठोड याने हडपसर येथील एका मोबाईल शॉपीमध्ये कामावर रुजू होत असल्याचे सांगितले. त्यानंतर दुकान मालक व इतर कोणीही नसल्याची संधी साधून त्याने दुरुस्तीसाठी आलेल्या ग्राहकांचे ७५,००० रुपये किमतीचे मोबाईल चोरून पळ काढला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी उपनिरीक्षक शुभम शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरू केला. आरोपीचा फोन बंद असल्याने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला. त्याद्वारे आरोपी अमरावती जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले. अंमलदार भाऊसाहेब खटके व अनिरुद्ध सोनवणे यांनी तात्काळ अमरावती गाठून त्याच्या सासरवाडीतून त्याला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता, डोक्यावर कर्ज जास्त झाल्याने पैशांच्या गरजेपोटी चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली.
ही कामगिरी उपआयुक्त जीवन बेनिवाल, सहाय्यक आयुक्त अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील, निरीक्षक निलेश जगदाळे व हनुमंत गायकवाड यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे उपनिरीक्षक शुभम शिंदे आणि अंमलदार दीपक कांबळे, निलेश किरवे, भाऊसाहेब खटके, अजित मदने, कुंडलिक केसकर, अभिजीत राऊत, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, महेश चव्हाण, तुकाराम झुंजार, आकाश धावडे, विजय कानेकर, धीरज शेलार, महावीर लोंढे व कृष्णा घोळवे यांच्या पथकाने केली.
Labels: Pune Police, Hadapsar News, Mobile Theft, Crime News, Pune Crime, Amravati
Search Description: Hadapsar Police arrest mobile thief Sanket Rathod from Amravati and recover stolen Samsung phones worth Rs 75 thousand.
Hashtags: #PunePolice #HadapsarCrime #MobileTheft #PuneCrime #Amravati
मोबाईल चोरी करणारा अट्टल चोरटा अमरावतीतून अटकेत; ७५ हजार रुपयांचे सॅमसंग फोन जप्त
Reviewed by ANN news network
on
१०/१०/२०२६ ०५:२४:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/१०/२०२६ ०५:२४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: