साडेसहा वर्षांपासून फरारी असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या सुसगाव व कात्रजमधून मुसक्या आवळल्या

पुणे : सहकारनगर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात मागील दिड वर्षांपासून फरार असलेले दोन सराईत आरोपी पुणे शहर गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ च्या जाळ्यात अडकले आहेत. पोलिसांनी सुसगाव आणि कात्रज परिसरामध्ये यशस्वी सापळा रचून दोन्ही आरोपींना जेरबंद केले आहे. सागर शैलेश गायकवाड (वय २५, रा. सुसगाव, पुणे) आणि आकाश शैलेश गायकवाड (वय २६, रा. कात्रज, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ चे अधिकारी व अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील (गु.र.नं. ९०/२०२५) पाहिजे आरोपींचा शोध घेत होते. यादरम्यान अंमलदार ज्ञानेश्वर पिंगळे यांना आरोपी सागर हा सुसगाव येथील 'श्री माऊली ओल्डएज होम' येथे नोकरी करत असल्याची, तर मलदार अमित गद्रे यांना दुसरा आरोपी आकाश हा कात्रज-कोंढवा परिसरातील 'वर्ल्ड फिटनेस जिम'मध्ये काम करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने पायगुडेनगर (सुसगाव) आणि टिळेकर नगर (कात्रज-कोंढवा) येथे एकाच वेळी छापा टाकून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी सहकारनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी अपर आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन, सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मारुती खेडकर आणि पथकातील अंमलदारांनी केली आहे.


  • Labels: Pune Crime Branch, Anti-Robbery Squad, Sahkar Nagar Police, Absconding Criminals Arrested, Pune Police

  • Search Description: Anti-Dacoity and Vehicle Theft Cell Unit-1 arrests two absconding brothers wanted in a serious Sahkar Nagar Police Station case after over a year.

  • Hashtags: #PuneCrimeBranch #AntiRobberySquad #SahkarNagarPolice #AbscondingArrest #PuneNews

साडेसहा वर्षांपासून फरारी असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या सुसगाव व कात्रजमधून मुसक्या आवळल्या साडेसहा वर्षांपासून फरारी असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या सुसगाव व कात्रजमधून मुसक्या आवळल्या Reviewed by ANN news network on १०/२२/२०२६ ०५:४८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".