मांजरी येथील आराध्या ज्वेलर्स चोरी प्रकरणातील आरोपी दिल्लीतून आरोपी गजाआड, ३१ लाखांची १३.७९२ किलो चांदी जप्त
पुणे :मुंढवा-मांजरी रोडवरील 'आराध्या ज्वेलर्स' दुकानाची भिंत फोडून कोट्यवधींचा ऐवज लांबवणाऱ्या घरफोडी प्रकरणातील एका मुख्य आरोपीला मांजरी पोलिसांच्या पथकाने दिल्लीतून अटक केली आहे. त्याच्याकडून ३१ लाख रुपये किमतीची तब्बल १३.७९२ किलो चांदी हस्तगत करण्यात आली आहे. कासिम मोहसीन शेख (वय ४१, रा. चांदणी चौक, दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मुंढवा-मांजरी रोडवरील ७३ अॅव्हेन्यू कॉम्प्लेक्समधील 'आराध्या ज्वेलर्स' दुकानाच्या मागील बाजूच्या खोलीतून बाथरूमची भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, पूजेचे साहित्य आणि रोकड लांबवली होती. या प्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला होता.
तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप राठोड यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, मांजरी पोलिसांचे पथक दिल्ली येथे रवाना झाले. त्यांनी दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ रोजी जामा मशीद परिसरातून कासिम मोहसीन शेख यास शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत तो सोन्या-चांदीचे दागिने बनविणारा कारागीर असल्याचे व फरार नातेवाईकाकडून चांदीचे दागिने घेऊन ते दिल्लीत विक्री केल्याचे समोर आले. पोलीस कोठडीच्या रिमांड मुदतीत पोलिसांनी त्याच्याकडून ३१,००,००० रुपये किमतीची १३.७९२ किलो चांदी जप्त केली असून, निरीक्षक (गुन्हे) इरफान नदाफ पुढील तपास करीत आहेत.
Labels: Manjri Police, Pune Crime, Jewelers Burglary, Silver Seized, Delhi Arrest, Pune Police
Search Description: Manjri Police arrest an accused from Delhi in connection with a major jewelry shop burglary and recover 13.792 kg silver worth Rs 31 lakh.
Hashtags: #ManjriPolice #PuneCrime #BurglaryArrest #SilverRecovery #PuneCity #CrimeNews
मांजरी येथील आराध्या ज्वेलर्स चोरी प्रकरणातील आरोपी दिल्लीतून आरोपी गजाआड, ३१ लाखांची १३.७९२ किलो चांदी जप्त
Reviewed by ANN news network
on
१०/२२/२०२६ ०५:४१:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/२२/२०२६ ०५:४१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: