तब्बल ५ वर्षांपासून फरारी असलेला आरोपी अटकेत


पुणे : येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाच्या प्रयत्नांच्या गंभीर गुन्ह्यात तब्बल पाच वर्षांपासून फरारी असलेल्या मुख्य आरोपीला पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने जेरबंद केले आहे. दीघी परिसरामध्ये सापळा रचून ही धडक कारवाई करण्यात आली आहे. संग्रामसिंग गजलसिंग भादा (वय ३५, रा. शिवनगरी कॉलनी, दिघी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

शहरातील रेकॉर्डवरील पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते. त्या अनुषंगाने युनिट-४ चे पथक खडकी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, अंमलदार नितीन साबळे व सुभाष आव्हाड यांना बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की, येरवडा पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात ५ वर्षांपासून पाहिजे असलेला संग्रामसिंग भादा हा दिघी येथील डि.पी. रोडवरील आपल्या घरी आला आहे.

मिळालेल्या माहितीची खात्री करून वरिष्ठ  निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दिघी येथील शिवनगरी कॉलनीत छापा टाकून संशयितास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने येरवडा पोलीस ठाण्यातील गुन्ह्याची कबुली दिली. येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्न (कलम ३०७), आर्म्स एक्ट आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कारवाईसाठी येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी अपर आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक कांचन जाधव, उपनिरीक्षक वैभव मगदुम आणि पथकातील अंमलदारांनी केली आहे.


  • Labels: Crime Branch Unit 4, Yerawada Police, Attempt to Murder, Absconder Arrested, Pune Police

  • Search Description: Crime Branch Unit 4 arrests an absconding accused wanted for the past 5 years in an attempt to murder case registered at Yerawada Police Station.

  • Hashtags: #CrimeBranchUnit4 #PunePolice #YerawadaPolice #AbsconderArrested #CrimeNews

तब्बल ५ वर्षांपासून फरारी असलेला आरोपी अटकेत तब्बल ५ वर्षांपासून फरारी असलेला आरोपी अटकेत Reviewed by ANN news network on १०/२२/२०२६ ०५:५८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".