नऱ्हे पोलीसठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघड; सव्वालाखांचा मुद्देमाल जप्त

 

पुणे: पुणे शहरातील नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली घरफोडीची एक गंभीर घटना उघडकीस आणण्यात स्थानिक पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लांबवणाऱ्या तिघा जणांच्या टोळीला नऱ्हे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून चोरीस गेलेला १ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

नऱ्हे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यानुसार, अज्ञात आरोपींनी फिर्यादी यांच्या बंद घराचे कुलूप उघडून १ लाख रुपयांचा सोन्याचा ४.९५ ग्रॅम वजनाचा लक्ष्मी हार, २५ हजार रुपयांचे सोन्याचे २.५४ ग्रॅम वजनाचे कानातले टॉप्स आणि २५ हजार रुपयांची रोकड असा एकूण सव्वा लाखांचा माल लांबवला होता. गुन्ह्या वेळी कोणताही प्रत्यक्ष साक्षीदार उपलब्ध नव्हता आणि आरोपीने चेहरा झाकल्यामुळे तपास करणे अत्यंत आव्हानात्मक होते.

तांत्रिक विश्लेषणातून आरोपी जेरबंद

वरिष्ठ निरीक्षक वर्षा देशमुख आणि  निरीक्षक (गुन्हे) ईश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलिसांनी गुन्ह्याच्या ठिकाणासमोरील आणि आजूबाजूच्या परिसरातील तसेच संभाव्य मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. दरम्यान,  अंमलदार प्रणिल मेस्त्री यांनी आरोपींच्या हालचालींचे तांत्रिक विश्लेषण केले.

तपासादरम्यान माऊली मंगल कार्यालयाजवळ, अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे येथील एका इमारतीत संशयित राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे आणि पथकाने तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेतले. संचिता सचिन गोसावी/कदम (वय ४२), दत्ता अरुण कदम (वय ३९) आणि दीपक बाळू ढेरंगे (वय ३४, सर्व रा. शुभंकर हाईट्स, अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची यशस्वी कामगिरी अपर आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, उपआयुक्त (परिमंडळ ३) सागर कवडे, सहायक आयुक्त (सिंहगड रोड विभाग) विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ  निरीक्षक वर्षा देशमुख,  निरीक्षक ईश्वर चव्हाण,  उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे आणि  अंमलदार प्रणिल मेस्त्री, निलेश भोरडे, पांडुरंग पवार, देवा चव्हाण, स्वप्नील सुर्यवंशी, सुनील चव्हाण, राजु तोरे, सुमित जगझाप, नितीन वाघमारे, धुळा गारळे, गोविंद कपाटे व कार्तीक कोंडे यांनी पार पाडली आहे.

  • Labels: Narhe Police Station, Pune Crime, House Burglary Arrest, Gold Recovery, Pune Police, Sinhagad Road News

  • Search Description: Narhe Police successfully cracked a house burglary case, arresting three accused and recovering gold ornaments and cash worth Rs 1.25 lakh.

  • Hashtags: #NarhePolice #PuneCrime #BurglaryArrest #PunePolice #GoldRecovery #CrimeNews

नऱ्हे पोलीसठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघड; सव्वालाखांचा मुद्देमाल जप्त नऱ्हे पोलीसठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघड; सव्वालाखांचा मुद्देमाल जप्त Reviewed by ANN news network on १०/१३/२०२६ ०३:३२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".