विमानतळ पोलिसठाण्याच्या हद्दीतील सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन जण जेरबंद


पुणे: पुणे शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसमधून प्रवास करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोन्याची चैन लांबवणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवळण्यात पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट सातच्या पथकाला मोठे यश आले आहे. या प्रकरणी दोघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २ लाख १७ हजार १४० रुपये किमतीची १५.५१ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हस्तगत करण्यात आली आहे.

दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ रोजी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक ज्येष्ठ नागरिक बसने प्रवास करत असताना अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन लांबवली होती. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२), ३ (५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन युनिट सातचे पथक या प्रकरणाचा समांतर तपास करत होते.

गोपनीय खबऱ्याच्या माहितीवरून कारवाई

तपासादरम्यान दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी सहायक पोलीस फौजदार राजू कदम यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय बातमीच्या आधारे युनिट सातच्या पथकाने मुंढवा येथील दर्ग्यामागील सर्वोदय कॉलनी परिसरात शोध घेतला. पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. रुक्मीणी शंकर जाधव (वय ५०) आणि नितीन शंकर जाधव (वय ३५, दोन्ही रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन केलेल्या कौशल्यपूर्ण चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीला गेलेली २ लाख १७ हजार १४० रुपये किमतीची सोन्याची चैन जप्त करण्यात आली आहे. अधिक कायदेशीर कारवाईसाठी दोन्ही आरोपींना आणि हस्तगत मुद्देमाल विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

सदरची यशस्वी कामगिरी अपर आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहायक आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सातचे  निरीक्षक वाहीद पठाण यांच्या सूचनांनुसार  उपनिरक्षक राहुल कोळपे, सहायक फौजदार राजू कदम, अंमलदार भरत उकीर्डे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निर्णय लांडे, विनायक साळवे, निलेश साळवे, गिरीश नाणेकर, विकास कदम, अमोल ढोणे, सुहास तांबेकर, भरत गुंडवाड, किरण पलांडे, समाधान पाटील आणि  नेहा तापकीर, सोनाली नरवडे, प्रतिक्षा पानसरे यांच्या पथकाने पार पाडली आहे.

  • Labels: Pune Crime Branch, Chain Snatching Arrest, Vimhanthal Police Station, Mundhwa Pune, Gold Recovery, Pune Police

  • Search Description: Pune Crime Branch Unit 7 arrested two accused in a chain-snatching case under Vimhanthal Police Station limits and recovered gold worth Rs 2.17 lakh.

  • Hashtags: #PuneCrime #ChainSnatching #PunePolice #CrimeBranch #GoldRecovery #Mundhwa

विमानतळ पोलिसठाण्याच्या हद्दीतील सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन जण जेरबंद विमानतळ पोलिसठाण्याच्या हद्दीतील सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन जण जेरबंद Reviewed by ANN news network on १०/१३/२०२६ ०३:२७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".