हायड्रोपोनिक गांजा आणि एमडी ड्रग्जसह दोघे गजाआड; कोंढवा पोलीस पथकाची मोठी कारवाई


पुणेपुण्यातील कोंढवा परिसर आणि आसपासच्या भागात अमली पदार्थ विक्री विरोधात विशेष मोहीम राबवत कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अवघ्या ४८ तासांत दोन स्वतंत्र कारवाया करत ८ लाख १३ हजार ८०० रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. यामध्ये महागडा विदेशी हायड्रोपोनिक गांजा आणि मेफेड्रॉन (एमडी) या घातक अमली पदार्थाचा समावेश आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून कोंढवा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ॲक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली कारवाई ३१ ऑगस्ट २०२६ रोजी कोंढवा खुर्द येथील एल. के. अपार्टमेंट समोर झाली. गस्तीदरम्यान अमली पदार्थ विरोधी पथकाला मोपेडवर संशयितरीत्या थांबलेला अमीर अकबर शेख (वय ३६, रा. एल. के. अपार्टमेंट, कोंढवा खुर्द) आढळला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १४९ ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा हायड्रोपोनिक गांजा (किंमत ५ लाख २१ हजार ५०० रुपये), रोख ३ हजार ३०० रुपये, २५ हजार रुपयांची व्हेगो गाडी आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटे असा एकूण ५ लाख ४९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला.

दुसरी कारवाई २८ ऑगस्ट २०२६ रोजी पॅराडाईज इन लॉजच्या खोली क्रमांक ४०५ मध्ये करण्यात आली. तेथे एक इसम मेफेड्रॉन (एमडी) ओढत असल्याची बातमी अंमलदार केशव हिरवे यांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने छापा टाकून अजीम सलीम शेख (वय ३७, रा. काशेवाडी, भवानी पेठ) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १२ ग्रॅम १० मिग्रॅम एमडी पावडर (किंमत २ लाख ४२ हजार ६०० रुपये), ५ हजार ५०० रुपये रोख, दोन मोबाईल आणि १५ इंजेक्शन सिरिंज असा एकूण २ लाख ६४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

कोंढवा परिसरातील अवैध अमली पदार्थ विक्री व सेवनाविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलली असून नागरिकांनी आपल्या परिसरातील अशा संशयित हालचालींची माहिती पोलिसांना द्यावी, माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

ही कामगिरी पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ-५ च्या उपआयुक्त राजलक्ष्मी शिवणकर, वानवडी विभागाचे सहायक आयुक्त रामदास इंगवले आणि वरिष्ठ निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रशांत मंडले, संतोष चौधरी, सहायक निरीक्षक महेंद्र डोके, उपनिरीक्षक रवींद्र गावडे, सागर पवार आणि अंमलदार अमोल हिरवे, केशव हिरवे, सचिन सुर्यवंशी, राहुल रासगे यांच्या पथकाने केली.

  • Labels: Kondhwa Police Station, Hydroponic Ganja, MD Drugs, Drug Raid, Pune Police, Crime News Pune

  • Search Description: Kondhwa Police seized foreign hydroponic ganja and MD drugs worth Rs 8.13 lakh in two separate raids within 48 hours. Two drug peddlers arrested.

  • Hashtags: #KondhwaPolice #DrugRaid #PuneCrime #MDDrugs #HydroponicGanja #PunePolice

हायड्रोपोनिक गांजा आणि एमडी ड्रग्जसह दोघे गजाआड; कोंढवा पोलीस पथकाची मोठी कारवाई हायड्रोपोनिक गांजा आणि एमडी ड्रग्जसह दोघे गजाआड; कोंढवा पोलीस पथकाची मोठी कारवाई Reviewed by ANN news network on ९/०३/२०२६ ०२:४१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".