पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत वृंदावन कथक नृत्यालय आयोजित ‘कृष्णार्पण’ हा कथक नृत्याविष्कार शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता, पुणे येथे सादर करण्यात येणार आहे.
विदुला बाळवेकर आणि त्यांच्या शिष्यांचा कथक नृत्याविष्कार या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवता येणार आहे. भगवान श्रीकृष्णाच्या विविध रूपांसोबत कथक नृत्यशैलीतील भाव, ताल, लय आणि अभिनयाचे सादरीकरण कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणारा हा ३०४ वा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाला सर्वांना प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.
Labels:
Krishnarpan, Kathak Dance, Pune Cultural Events, Indian Classical Dance, Vidula Balwekar, Indian Vidya Bhavan, Infosys Foundation, Vrindavan Kathak Nrityalaya, Pune Events, Cultural Programme
Search Description:
‘Krishnarpan’ Kathak dance presentation by Vidula Balwekar and her disciples will be held on September 12 at Indian Vidya Bhavan in Pune. The cultural programme is free and open to all.
Hashtags:
#Krishnarpan #Kathak #KathakDance #PuneEvents #IndianClassicalDance #VidulaBalwekar #IndianVidyaBhavan #InfosysFoundation #CulturalProgramme #PuneCulture
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: