दागिने चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद!; २ महिलांसह ३ जणांना अटक, अडीच लाखांचे दागिने जप्त


पुणे (विशेष प्रतिनिधी): पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव देखावा बघण्यासाठी आलेल्या महिला भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका सराईत आंतरजिल्हा टोळीला फरासखाना पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत दोन महिला आणि एका पुरुष आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून २,५९,१४० रुपये किंमतीचे १८.५१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चोऱ्यांसाठी वापरले जाणारे लोखंडी कटर जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे फरासखाना व विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एकूण ५ गुन्ह्यांचा १०० टक्के मुद्देमालासह उलगडा झाला आहे.

२० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९:०० वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला आपल्या नातेवाईकांसह छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक रस्त्यावरील स्टॉलसमोर दगडूशेठ गणपतीचा देखावा पाहत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात भामट्याने त्यांच्या गळ्यातील ३.५ ग्रॅम सोन्याच्या वाट्या आणि साक्षीदाराच्या गळ्यातील ३ ग्रॅमचे दागिने असा ३८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.

गोपनीय बातमीदाराच्या खबरीवरून शिताफीने कारवाई

गणेशोत्सव काळात भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलीस उपआयुक्त कृषीकेश रावले यांनी फरासखाना पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप देशमाने यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले त्यानुसार उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे व अंमलदारांचे विशेष पथक तयार करण्यात आले.

गस्त घालत असताना पोलीस हवालदार गजानन सोनुने आणि अजिम शेख यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे पथकाने संशयित दोन महिला व एका पुरुषाला ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे: १) आरती आकाश चव्हाण (वय २२, रा. मिठमिठा, जि. छत्रपती संभाजीनगर),२) सुवर्णा रोहित शिंदे (वय ३५, रा. मु.पो. वरदडा, ता. चिखली, जि. बुलढाणा), ३) रोहित उर्फ दीपक शिंदे (वय ४०, रा. वरदडा, ता. चिखली, जि. बुलढाणा)

५ गुन्ह्यांचा उलगडा; १००% मुद्देमाल हस्तगत

आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिने आणि गर्दीत दागिने कापण्यासाठी वापरले जाणारे लोखंडी कटर मिळून आले. पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी दगडूशेठ गणपती परिसरात व आसपास केलेल्या चोऱ्यांची कबुली दिली.

त्यांच्याकडून २,५९,१४० रुपये किंमतीचे १८.५१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून फरासखाना पोलीस ठाण्याचे २ आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याचे ३ असे एकूण ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार महेश राठोड करत आहेत

ही कामगिरी अप्पर आयुक्त राजेश बनसोडे,  उपआयुक्त कृषिकेश रावले, सहाय्यक आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संदीप देशमाने, निरीक्षक (गुन्हे) शिवप्रकाश मुळे, महाला, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, अंमलदार गजानन सोनुने, अजिम शेख, महेश राठोड, नितीन जाधव, नितीन तेलंगे, प्रविण पासलकर, अमोल अवाड, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, चेतन होळकर, सुमित खुट्टे, प्रशांत पालांडे आणि महिला अंमलदार कुंडे व फुपाने यांनी केली.

  • Labels: Pune Crime News, Faraskhana Police, Dagdusheth Ganpati, Jewelry Theft Gang, Pune Police

  • Search Description: Faraskhana Police Pune arrest 3 members of an inter-district gang including 2 women for stealing gold jewelry of devotees at Dagdusheth Ganpati.

  • Hashtags: #DagdushethGanpati #FaraskhanaPolice #GoldTheftGang #PunePolice #GaneshotsavCrime #PuneNews

दागिने चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद!; २ महिलांसह ३ जणांना अटक, अडीच लाखांचे दागिने जप्त  दागिने चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद!; २ महिलांसह ३ जणांना अटक, अडीच लाखांचे दागिने जप्त Reviewed by ANN news network on ९/२५/२०२६ ०३:५८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".