'पंतप्रधान मोदी उद्धव ठाकरेंप्रमाणे खासदारांसाठी दरवाजे बंद करत नाहीत'; भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर पलटवार


मुंबई, ८ ऑगस्ट २०२६: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे स्वतःचे दरवाजे खासदार आणि आमदारांसाठी बंद करून ठेवत नाहीत. देशातील १४० कोटी जनतेचे नेतृत्व करणारे पंतप्रधान सातत्याने सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींना वेळ देऊन त्यांच्याशी संवाद साधतात. शिवसेनेच्या खासदारांशी त्यांनी संवाद साधल्याने संजय राऊत यांचा तिळपापड होण्याचे कोणतेही कारण नाही, असा घणाघाती पलटवार भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित अधिकृत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांवर केलेल्या आरोपांना उत्तर देताना नवनाथ बन म्हणाले की, मातोश्रीवर खासदारांना आणि कार्यकर्त्यांना सातत्याने डावलले गेल्यामुळेच आमदारांनी आणि खासदारांनी साथ सोडली आणि पक्षाची दुरवस्था झाली.

'मातोश्रीवरील तेलकट वड्यांचा इतिहास आठवा'

पंतप्रधान निवासातील भेटीवर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेताना नवनाथ बन यांनी मातोश्रीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, मातोश्रीवर कोणाला तेलकट वडे दिले जायचे हे राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आधीच सांगितले आहे. आता तर खासदार आणि आमदारांना ते वडेही मिळणे बंद झाले आहे. काँग्रेस पक्षासोबत राजकीय सोय करणे हेच एकमेव काम सध्या सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याबाबत बोलताना ते म्हणाले की, न्यायालयात कायद्यानुसार निकाल लागेलच, मात्र महाराष्ट्रातील जनता वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आणि एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. राज्यातील जनतेने खऱ्या शिवसेनेवर आधीच शिक्कामोर्तब केले आहे.

नारीशक्ती विधेयकावरून विरोधकांवर टीका

नारीशक्ती विधेयकाला संजय राऊत आणि विरोधकांकडून होत असलेल्या विरोधाचा निषेध करत भाजप मुख्य प्रवक्त्यांनी सांगितले की, महिला आरक्षण आणि नारी सन्मानाच्या मुद्द्यावर विरोधकांची भूमिका नकारात्मक आहे. महिलांचा सन्मान न करणाऱ्या आणि विधेयकाला विरोध करणाऱ्यांना देशातील माता-भगिनी आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत योग्य धरा शिकवतील. उद्या सभागृहात सक्षम महिला प्रतिनिधी आल्या तर आपली पळता भुई थोडी होईल, या भीतीने विरोधक या विधेयकाला विरोध करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कंत्राटदार आणि पालिकेतील २५ वर्षांच्या कारभारावर प्रश्न

नाशिक कुंभमेळ्याच्या कंत्राटांवरून उठलेल्या वादावर उत्तर देताना नवनाथ बन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा पुनरुच्चार केला. कुंभमेळ्याची कंत्राटे मराठी कंत्राटदारांनाही मिळत असून, त्यांची नावे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना पाठवून दिली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

यासोबतच, मुंबई महापालिकेत २५ वर्षे सत्ता भोगताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी किती मराठी कंत्राटदारांना संधी दिली आणि प्रोत्साहन दिले, याची अधिकृत यादी त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर करून दाखवावी, असे थेट आव्हान भाजप प्रदेश मुख्य प्रवक्त्यांनी दिले.

Labels:

Navnath Ban, BJP Maharashtra, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Maharashtra Politics, Narendra Modi, Eknath Shinde

Search Description:

BJP Maharashtra chief spokesperson Navnath Ban slams Sanjay Raut over criticism of PM Narendra Modi meeting Shiv Sena MPs.

Hashtags:

#BJP #MaharashtraPolitics #NavnathBan #SanjayRaut #UddhavThackeray #NarendraModi #ShivSena #PressConference




'पंतप्रधान मोदी उद्धव ठाकरेंप्रमाणे खासदारांसाठी दरवाजे बंद करत नाहीत'; भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर पलटवार 'पंतप्रधान मोदी उद्धव ठाकरेंप्रमाणे खासदारांसाठी दरवाजे बंद करत नाहीत'; भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर पलटवार Reviewed by ANN news network on ८/०८/२०२६ ०६:३६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".