पुणे : पुणे शहरात आणि ग्रामीण भागात गंभीर गुन्हे करून फरार झालेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने खूनासारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्यात हवा असलेला आणि मोका गुन्ह्यातून जेल बाहेर आलेला एक सराईत पाहिजे आरोपी जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे. कात्रज येथील सच्चाई मातानगर परिसरात सापळा रचून या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर राजगड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
कारवाईबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दिनांक २१ जुलै २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील अधिकारी व अंमलदार त्यांच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. गस्त सुरू असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, विजय पवार, सर्जेराव सरगर व शंकर कुंभार यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत अत्यंत महत्त्वाची बातमी मिळाली. राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील एक पाहिजे असलेला आरोपी कात्रजमधील सच्चाई मातानगर भागात थांबलेला असल्याची पक्की माहिती मिळाली. सदर बातमीची गांभीर्य लक्षात घेऊन पथकाने त्वरित युनिट २ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांना याची माहिती दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी तात्काळ नमुद ठिकाणी जाऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. आदेशाचे पालन करत युनिट २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तत्काळ सच्चाई मातानगर, कात्रज येथे छापा टाकून पाहणी केली व पसार झालेल्या आरोपीला ताब्यात घेतले. पकडलेल्या आरोपीचे नाव महेश तानाजी घोगरे, वय ३२ वर्षे, रा. जैन मंदिर जवळ, साईबाबा मंदिर जवळ, कात्रज, पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले. या आरोपीबाबत राजगड पोलीस ठाण्यात (पुणे ग्रामीण) चौकशी केली असता, तो राजगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु.र.नं. ४४६/२०२६ मधील भारतीय न्याय संहितेचे कलम १०९, ११८(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) या गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाले.
विशेष म्हणजे हा आरोपी पोलीस रेकॉर्डवरील असून तो मोका गुन्ह्यात जेल रिलीज झालेला सराईत गुन्हेगार आहे. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यास राजगड पोलीस ठाण्याच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त गुन्हे गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शेलश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या सूचनांनुसार पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी आणि युनिट २ च्या सर्व पोलीस अंमलदारांनी पार पाडली आहे.
Labels: Pune Police, Crime Branch Unit 2, Wanted Criminal Arrested, MCOCA Released, Katraj Pune
Search Description: Pune Crime Branch Unit 2 arrested a wanted criminal involved in an attempt to murder case under Rajgad police station limits from Katraj, Pune.
Hashtags: #PunePolice #CrimeBranch #WantedCriminal #KatrajPune #LawAndOrder #MaharashtraPolice
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर पोलिसांची मोठी कारवाई; पसार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या
Reviewed by ANN news network
on
७/२३/२०२६ ०८:३३:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: