मुंबई | २८ जुलै २०२६ : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे (MMRDA) राबवल्या जाणाऱ्या शिवडी ते वरळी उन्नत मार्गाच्या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी जगन्नाथ भातणकर मार्गावर पोल उभारणीचे काम सुरू होणार आहे. यामुळे नागरिकांना होणारा धोका, अडथळा व गैरसोय टाळण्यासाठी संपूर्ण जगन्नाथ भातणकर मार्ग २९ जुलै २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत आहे.
मुंबई वाहतूक शाखेच्या पोलीस उप आयुक्त (मुख्यालय व मध्य विभाग) डॉ. दिपाली धाटे यांनी मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ११५ नुसार मिळालेल्या अधिकाराचा वापर करून ही अधिसूचना जारी केली आहे.
वाहतूक व्यवस्थेतील बदल पुढीलप्रमाणे:
बंद मार्ग: संपूर्ण जगन्नाथ भातणकर मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील.
पर्यायी मार्ग: सेनापती बापट मार्गाने दक्षिण वाहिनीने येणारी व जगन्नाथ भातणकर मार्गाकडे जाणारी वाहने एल्फिन्स्टन जंक्शन येथे उजवे वळण न घेता सेनापती बापट मार्ग - वडाचा नाका - उजवे वळण - ना. म. जोशी मार्ग - धनमिल नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
नागरिकांनी व वाहनधारकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे आणि दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाद्वारे करण्यात आले आहे.
Labels: Mumbai Traffic Update, Jagannath Bhatankar Marg Closed, MMRDA, Traffic Diversion, Sewri Worli Connector, Mumbai Police
Search Description: Jagannath Bhatankar Marg in Mumbai closed for traffic from July 29 to December 31, 2026 for Sewri-Worli Elevated Connector construction. Check alternate routes.
Hashtags: #MumbaiTraffic #TrafficAdvisory #MMRDA #RoadClosure #Worli #MumbaiNews #TrafficUpdate
शिवडी-वरळी उन्नत मार्गाच्या कामासाठी जगन्नाथ भातणकर मार्ग ३१ डिसेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद
Reviewed by ANN news network
on
७/२९/२०२६ ११:४४:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: