संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेना पिंपरी-चिंचवड शहरात राबवणार "घोंगडी बैठका"; खासदार श्रीरंग बारणे यांच्या आदेशाने थेट जनसंवादाला सुरुवात
पिंपरी: शिवसेनेची संघटनात्मक बांधणी तळागाळापर्यंत अधिक व्यापक आणि भक्कम करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहरात 'घोंगडी बैठका' या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
या प्रभागस्तरीय 'घोंगडी बैठकीं'मध्ये शिवसेना पदाधिकारी थेट जनतेच्या दारात जाऊन त्यांच्या स्थानिक समस्या आणि प्रश्न जाणून घेणार आहेत
"घराघरात शिवसेना... प्रत्येक शिवसैनिकापर्यंत संघटना" हा दृढ संकल्प समोर ठेवून या घोंगडी बैठकींच्या माध्यमातून पक्षाची मूळ विचारधारा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे
शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड महानगरप्रमुख राजेश किसन फलके यांनी पत्रकाद्वारे शहरातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, युवासेना, सर्व शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना आपापल्या प्रभागात या 'घोंगडी बैठका' यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे जाहीर आवाहन केले आहे
Labels: Shivsena Pimpri Chinchwad, MP Srirang Barne, Rajesh Phalke, Ghongadi Baithak, Party Campaign, Pimpri Chinchwad Politics
Search Description: Shivsena Pimpri Chinchwad under the leadership of Maval MP Srirang Barne to launch "Ghongadi Baithak" from July 4 to strengthen its booth-level organisation.
Hashtags: #Shivsena #SrirangBarne #RajeshPhalke #PimpriChinchwad #GhongadiBaithak #Maval #PCMCPolitics #JanSamvad
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: