संजय राऊत, रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून पेपरफुटीच्या खोट्या अफवा; पुरावा देण्याचे नवनाथ बन यांचे आव्हान

 


 मुंबई | २९ जुलै २०२६ : महाराष्ट्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) किंवा व्यावसायिक प्रवेश परीक्षा कक्षाचा (CET Cell) कोणताही पेपर फुटलेला नसताना केवळ राजकीय स्वार्थासाठी राज्य आणि येथील सक्षम शिक्षणव्यवस्थेला बदनाम करण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. संजय राऊत, रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ हे सातत्याने खोट्या अफवा पसरवत असून त्यांच्याकडे पेपरफुटीचा एकही पुरावा नाही, असा थेट आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

एमपीएससी आणि सीईटी सेलच्या अध्यक्षांनी परीक्षांच्या पारदर्शकतेबाबत अधिकृत स्पष्टीकरण दिल्यानंतर विरोधकांचे दावे फोल ठरले असून ते आता मूग गिळून गप्प बसले आहेत. महाराष्ट्राची शिक्षणव्यवस्था नेहमीच सक्षम होती आणि आजही अतिशय दर्जेदार आहे. केवळ स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी इथल्या शिक्षणव्यवस्थेला दोष देणे आणि विद्यार्थ्यांना भ्रमित करणे तात्काळ बंद करावे, असा इशारा नवनाथ बन यांनी दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या मित्रपक्षांवर कडक शब्दांत टीका केली. संजय राऊत आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या वरिष्ठांना जाऊन विचारले पाहिजे की काँग्रेसशासित पंजाब आणि कर्नाटकात झालेल्या पेपरफुटी प्रकरणांवर काय कारवाई करण्यात आली. तिथे एकावरही कडक कारवाई झाली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. याउलट महाराष्ट्रात कोणतीही पेपरफुटी झालेली नाही. हर्षवर्धन सपकाळ यांनी खोटे दावे केल्यामुळे आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांच्याविरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे. लातूरमधील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेत ६० टक्क्यांच्या आसपास गुण मिळालेले असताना चुकीचा प्रचार केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अभ्यासक्रमातील बदलांवरून विरोधकांवर टीका करताना नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत ज्या औरंगजेब, बाबर, मुघल आणि अब्दालीच्या विचारांचे कौतुक करतात, त्यांचा इतिहास आता अभ्यासक्रमातून हटवण्यात आला आहे, हीच त्यांची खरी पोटदुखी आहे. महाराष्ट्रात यापुढे मुघलांचे उदात्तीकरण शिकवले जाणार नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचा प्रेरणादायी इतिहास शिकवला जाईल. मुघलांचे कौतुक बंद झाल्यानेच विरोधकांना शिक्षणव्यवस्था वाईट वाटू लागली आहे. राज्य चालवण्यासाठी देवेंद्र फडणवीस पूर्णपणे सक्षम असून त्यांना संजय राऊतांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत यांच्या राजकीय भूमिकेचा समाचार घेताना नवनाथ बन यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. पंडित नेहरू, सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्यावर टीका झाली की संजय राऊत बचावासाठी पुढे येतात. याच सोनिया गांधींचा उल्लेख सामनातून 'करप्शन क्वीन' असा करण्यात आला होता, याचा विसर राऊतांना पडला आहे का, असा सवाल त्यांनी केला. केवळ राज्यसभेची खासदारकी मिळवण्यासाठी आणि राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसची चाटुगिरी सुरू असून काँग्रेसचे जहाज बुडल्यामुळे आता त्यांच्या नादाला लागलेला उबाठा गटही बुडणार असल्याचा दावा त्यांनी केला.

सीईटी परीक्षेतील गुणपद्धतीवर स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल यातील फरक समजून न घेताच विरोधक टीका करत आहेत. काँग्रेसच्या काळापासून सीईटी परीक्षा अस्तित्वात असून त्या काळातही बारावीत ५० टक्के असलेल्या विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये उच्च गुण मिळत असत. अफवा पसरवणे बंद करून हिंमत असेल तर हर्षवर्धन सपकाळ यांनी मोटेगावकरांबद्दल अमित देशमुख यांना जाब विचारून दाखवावा, असे आव्हान नवनाथ बन यांनी शेवटी दिले.


  • Labels: BJP Maharashtra, Navnath Ban, Sanjay Raut, MPSC, MHT CET, Paper Leak Controversy, Maharashtra Politics

  • Search Description: BJP spokesperson Navnath Ban slams Sanjay Raut and opposition over fake paper leak allegations, defending Maharashtra education system and CET Cell.

  • Hashtags: #BJP #NavnathBan #SanjayRaut #MHTCET #MPSC #MaharashtraPolitics #EducationSystem

संजय राऊत, रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून पेपरफुटीच्या खोट्या अफवा; पुरावा देण्याचे नवनाथ बन यांचे आव्हान संजय राऊत, रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून पेपरफुटीच्या खोट्या अफवा; पुरावा देण्याचे नवनाथ बन यांचे आव्हान Reviewed by ANN news network on ७/३०/२०२६ १२:४९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".