खराडीतील भोंदूबाबा राधामोहन मिश्रा सह आठजण अटकेत; २५ वर्षे करत होता उच्चशिक्षित महिलांचे लैंगिक शोषण

पुणे: स्वतःला ईश्वर (देव) असल्याचे भासवून गेल्या २५ वर्षांपासून एकाच कुटुंबातील महिलांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक, मानसिक फसवणूक करणे आणि अमानुष छळ करून उच्चशिक्षित तरुणीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या भोंदू बाबासह त्याच्या दोन पुरुष आणि सहा महिला सहकाऱ्यांना खराडी पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून अटक केली आहे. १८ जून २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रेसनोट क्रमांक ३७८ नुसार, खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २१०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३, ४ आणि ५ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून ८ लॅपटॉप, १९ हार्डडिस्क आणि साडेसहा लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह एकूण २५,७७,२४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या गंभीर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव राधामोहन मिश्रा (वय ५९, रा. माउली सदन, उबाळेनगर, खराडी, पुणे) असे असून, त्याला मदत करणाऱ्या स्वामी कंवल नयन (वय ५८), कीर्ती हंसराज अहुजा (वय ३८), खुशबू गजेंदर हुडीया (वय ३७), श्वेता अवधबिहारी मिश्रा (वय ३७), अमृता अवधबिहारी मिश्रा (वय ३२), श्वेता संजय पांडे (वय २८) आणि कनिका हंसराज अहुजा (वय ३४, रा. कुरुक्षेत्र, हरियाणा) यांनाही पोलिसांनी बेड्या आवळल्या आहेत.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, सन २००१ ते २०२६ या प्रदीर्घ कालावधीत मुख्य आरोपी राधामोहन मिश्रा याने पीडितेच्या कुटुंबावर आपल्या तथाकथित दैवी शक्तीचा प्रभाव पाडून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत आरोपीने कुटुंबाचे प्रचंड आर्थिक आणि भावनिक नुकसान केले. सन २००९ ते २०२६ दरम्यान, मिश्रा याने आपल्या इतर सात महिला व पुरुष सहकाऱ्यांच्या मदतीने पीडितेवर दबाव निर्माण केला. तिला कुटुंबीयांपासून वेगळे करून, वारंवार बेदम मारहाण, शिवीगाळ आणि अमानुष छळ करत तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
या अघोरी कृत्याची माहिती मिळताच अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ७) प्रशांत अमृतकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली खराडी पोलिसांच्या पथकाने उबाळेनगर येथील 'रेणुका पार्क' मधील माउली सदन या घटनास्थळावर धडक छापा टाकला. झडतीदरम्यान पोलिसांनी खोलीतून गुन्ह्याशी संबंधित इलेक्ट्रॉनिक पुरावे जसे की ८ लॅपटॉप, ९ मोबाईल फोन, १९ हार्डडिस्क, २० कॅसेट्स, १० डीव्हीडी, २ सीपीयू, २३ पेनड्राइव्ह आणि ६ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले. या खळबळजनक गुन्ह्याचा पुढील सखोल तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, अपर आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, उपआयुक्त गौहर हसन, उपआयुक्त प्रशांत अमृतकर, सहायक पोलीस आयुक्त (खराडी विभाग) नुतन पवार, सहायक आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण, सहायक निरीक्षक रवींद्र गोडसे, अंमलदार नवनाथ वाळके, नाणेकर, श्रीकांत शेळके, सुरेंद्र साबळे आणि श्रीकांत कोद्रे यांनी केली आहे.
Labels: Pune Police, Kharadi Ashram Case, Fake Baba Mishra Arrest, Anti Superstition Act, Cyber Evidence Seized, Crime News Pune, kharadi
Search Description: Pune Police registered an FIR against fake godman Radhamohan Mishra and 7 others for cheating, raping, and torturing a family for 25 years under the Anti-Superstition Act in Kharadi
Hashtags: #PunePolice #KharadiCrime #FakeBabaMishra #SuperstitionAct #CrimeBranchPune #WomenSafety #JusticeForVictim
खराडीतील भोंदूबाबा राधामोहन मिश्रा सह आठजण अटकेत; २५ वर्षे करत होता उच्चशिक्षित महिलांचे लैंगिक शोषण
Reviewed by ANN news network
on
६/१८/२०२६ ०६:३०:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
६/१८/२०२६ ०६:३०:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: