पुणे:
पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने आंबेगाव पठार परिसरात बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका ३८ वर्षीय इसमाला अटक केली आहे. त्याच्या अंगझडतीमध्ये पोलिसांनी एक गावठी पिस्तुल आणि ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. दिनेश सुरेश ढोरे (वय ३८ वर्षे, रा. शिवकॉलनी, गल्ली नं. २, आंबेगाव पठार, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
२६ जून २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी आणि त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांचा शोध घेत होते. यादरम्यान पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे आणि उज्वल मोकाशी यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, एक इसम शिवकॉलनी, गल्ली नं. ३, आंबेगाव पठार येथे बेकायदेशीर घातक अग्निशस्त्र घेऊन थांबलेला आहे. ही माहिती तात्काळ गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांना देण्यात आली, त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
आदेश मिळताच तपास पथकाने शिवकॉलनी भागात जाऊन दिनेश ढोरे याला ताब्यात घेतले. त्याची कसून अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ४०,८०० रुपये किमतीचे एक पिस्तुल आणि ४ जिवंत काडतुसे मिळून आली. हा सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम (आर्म्स ॲक्ट) कलम ३(२५) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ही यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्त गौहर हसन, आणि सहायक आयुक्त शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, तेजश्री पवार आणि अंमलदारांच्या पथकाने केली आहे.
Labels: Pune Crime Branch, Pistol Seized, Ambegaon Pathar, Arms Act Case, Crime Branch Unit 2, Gun Seizure Pune
Search Description: Pune Crime Branch Unit 2 has arrested Dinesh Dhore with an illegal pistol and 4 live cartridges from Ambegaon Pathar. Read the police operation report here.
Hashtags: #PistolSeized #PuneCrimeBranch #AmbegaonPathar #ArmsAct #PunePolice #CrimeNews #GunsSeized
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: