पुणे पोलिसांची मोठी कारवाई; कोथरूडमधून निलेश घायवळ टोळीतील 'चांग्या' गजाआड


पुणे: पुणे शहरातील कोथरूड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने २४ जून २०२६ रोजी सुतार हॉस्पिटल जवळील मंडई भागात सापळा रचून कुख्यात निलेश घायवळ टोळीतील पाहिजे असलेल्या एका सराईत गुंडाला अटक केली आहे. निलेश उर्फ चांग्या हरिशंकर शर्मा (वय ३८, रा. गुजरात कॉलनी, कोथरूड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का (MCOCA) आणि जामखेड पोलीस ठाण्यातील खून (मर्डर) प्रकरणातील गुन्ह्यांमध्ये पोलिसांना बऱ्याच दिवसांपासून पाहिजे होता.

कोथरूड पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार विष्णू राठोड, आकाश वाल्मिकी आणि वैभव शितकाल यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून ठोस माहिती मिळाली. जामखेड पोलीस ठाण्यातील खून प्रकरणातील आणि कोथरूड पोलीस ठाण्यातील गु.र.नं २७७/२०२५ मधील मोक्का कायद्यानुसार पाहिजे असलेला आरोपी चांग्या शर्मा सुतार हॉस्पिटल जवळील मंडईत बसला आहे, अशी ती माहिती होती.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या आदेशानुसार पोलिसांनी तत्काळ मंडई भागात वेढा घातला आणि चांग्या शर्मा याला ताब्यात घेऊन अटक केली. या गुंडावर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि आर्म्स ॲक्टसह अनेक गंभीर कलमांन्वये गुन्हे नोंद आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त (कोथरूड विभाग) सुजाता तानवडे करत आहेत.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर) राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ३) सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, सुनील कारोटे यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण, पोलीस अंमलदार विष्णू राठोड, आकाश वाल्मिकी, वैभव शितकाल, मंगेश शेळके, मयुर पांढरे, श्रीकांत दगडे व दत्ता सोनवणे यांनी केली.

  • Labels: Pune Crime, Nilesh Ghaywal Gang, MCOCA, Kothrud Police, Criminal Arrested

  • Search Description: Kothrud police in Pune arrested Nilesh उर्फ Changya Harishankar Sharma, a member of the Nilesh Ghaywal gang wanted in murder and MCOCA cases.

  • Hashtags: #PuneCrime #KothrudPolice #GhaywalGang #MCOCA #PunePolice

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; कोथरूडमधून निलेश घायवळ टोळीतील 'चांग्या' गजाआड पुणे पोलिसांची मोठी कारवाई; कोथरूडमधून निलेश घायवळ टोळीतील 'चांग्या' गजाआड Reviewed by ANN news network on ६/२६/२०२६ १०:४७:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".