मुंबई: मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने बनावट ए.पी.के. (APK) फाईल पाठवून नागरिकांचे मोबाईल हॅक करणाऱ्या आणि त्यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे झारखंड, बिहार आणि दिल्ली येथून एकूण ६ सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे. या टोळीने महानगर गॅस लिमिटेडच्या (MGL) ग्राहकांना टार्गेट करून "MGL GAS UNBLOCK FILE.apk" द्वारे बँक खात्यांची गोपनीय माहिती चोरून देशभरात तब्बल ४३ कोटी २५ लाख ७७ हजार ४९७ रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
मुंबईतील एका तक्रारदाराला महानगर गॅसच्या नावाने बनावट संदेश पाठवून हे ॲप इन्स्टॉल करण्यास भाग पाडले होते आणि त्यांची २ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी सायबर पोलीस ठाणे (पश्चिम विभाग, मुंबई) येथे गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला होता.
तपासादरम्यान अटक केलेल्या आरोपींमध्ये आरिफ अस्तुन अन्सारी, शेख बेलाल नौशाद, मेहबूब नौशाद आलम, साजिद मन्सूर अली, मोहन कुशल महतो आणि सुनील कुमार दशरथ सोरेन यांचा समावेश आहे. आरोपींकडून ११ मोबाईल, १ लॅपटॉप आणि विविध बँका, आरटीओ व महानगर गॅसच्या नावाच्या १११ बनावट APK फाईल्स जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीच्या सर्व्हर पॅनेल व डेटाबेसमधून तब्बल १.२४ कोटी एसएमएस रेकॉर्ड्स आणि ८,६०९ हॅक केलेले मोबाईल क्रमांक पोलिसांना सापडले आहेत, ज्यात बँक खाती, एटीएम कार्ड नंबर, पिन आणि सीव्हीव्ही डेटा चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
सायबर गुन्हे शाखेच्या विश्लेषणात या टोळीचा भारतातील एकूण ३,२०६ सायबर गुन्ह्यांमध्ये थेट सहभाग असल्याचे समोर आले आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील ५१७ आणि मुंबईतील ९३ गुन्ह्यांचा समावेश आहे. पुढील तपासासाठी संबंधित राज्यांच्या पोलिसांना आणि आय४सी (I4C) संस्थेला माहिती देण्यात आली आहे.
ही उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई) देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन गच्चे, धनवेश पाटील, विजय घोरपडे, पोलीस उपनिरीक्षक दीपक तायडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश खुशलाणी, पोलीस हवालदार सचिन सावंत, प्रशांत भुवड, महेंद्र तावडे आणि पोलीस शिपाई विकास दिगे, संग्राम जाधव, सुयेश लोकरे, अमोल फापळे, मयूर इंगळे, ओमकार शिंदे व अनिल वारे यांनी केली.
Labels: Cyber Crime Mumbai, Fake APK Fraud, Online Scams, Mumbai Police Action, Cyber Security
Search Description: Mumbai Cyber Police busted an interstate gang arresting 6 frauds from Jharkhand, Bihar, and Delhi for hacking mobiles via fake APK files.
Hashtags: #CyberCrime #MumbaiPolice #CyberSecurity #OnlineFraud #TechScam #Hacking
मोठं रॅकेट उद्ध्वस्त! बनावट APK फाईलने मोबाईल हॅक करून करोडोंची लूट करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात
Reviewed by ANN news network
on
६/२६/२०२६ १०:५६:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: