जे जे रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांचे मोबाईल चोरणारा सराईत जेरबंद; ७ महागडे फोन जप्त


मुंबई: सर जे जे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या निष्पाप रुग्णांच्या नातेवाईकांचे मोबाईल चोरणाऱ्या एका २४ वर्षीय सराईत गुन्हेगाराला जे जे मार्ग पोलिसांनी १६ जून २०२६ रोजी वेषांतर करून सापळा रचत शिताफीने ताब्यात घेतले. सागर श्याम पारखे (रा. मानखुर्द, मुंबई) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून रुग्णालयातून चोरी केलेले एकूण ७ मोबाईल फोन हस्तगत केले असून, या कारवाईमुळे जे जे मार्ग पोलीस ठाण्यातील मोबाईल चोऱ्यांचे एकूण ३ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.

रुग्णालया परिसरातून सतत मोबाईल गहाळ होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर, पोलीस उपनिरीक्षक सैफन कुरणे व गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, एक संशयित इसम गुन्ह्याच्या वेळी परिसरात घुटमळत असल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याचे छायाचित्र मिळवले. दरम्यान, हा संशयित पुन्हा चोऱ्या करण्याच्या उद्देशाने जे जे रुग्णालय परिसरात येणार असल्याची अत्यंत गोपनीय माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली.

माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारांनी तातडीने वेषांतर करून रुग्णालय परिसरात सापळा रचला. संशयित आरोपी येताच त्याला शिताफीने ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घरातून पंचनाम्यांतर्गत सर्व ७ मोबाईल जप्त केले आहेत. या कामगिरीमुळे जे जे मार्ग पोलीस ठाण्यातील गु.र.क्र. ४७६/२०२६, ४७८/२०२६ आणि ४७९/२०२६ हे गुन्हे उघड झाले आहेत.

ही धडक कारवाई पोलीस उप आयुक्त (दक्षिण परिमंडळ-१) मनीष कलवानिया यांच्या आदेशाने आणि सहायक पोलीस आयुक्त तनवीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रईस शेख, पोलीस निरीक्षक मुकुंदा वाघमोडे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सैफन कुरणे, पोलीस हवालदार शिंदे, जाधव, पोलीस शिपाई बोडके, भोळे, काळे आणि धात्रक यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.


  • Labels: Mumbai Police, Mobile Theft, Arrest, J J Hospital, Crime News

  • Search Description: JJ Marg police station arrest a 24-year-old serial mobile thief Sagar Parkhe from Mankhurd and recovered 7 stolen mobile phones.

  • Hashtags: #Mumbai Police #CrimeUpdate #MobileTheft #JJHospital #ActionAgainstCrime

जे जे रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांचे मोबाईल चोरणारा सराईत जेरबंद; ७ महागडे फोन जप्त जे जे रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांचे मोबाईल चोरणारा सराईत जेरबंद; ७ महागडे फोन जप्त Reviewed by ANN news network on ६/१८/२०२६ ०९:०९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".