मुंबई: प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) अंधेरी, मुंबई येथील जप्त करून ब्लॉक करण्यात आलेले ड्रायव्हिंग लायसन्स पुन्हा सुरू करून मिळवून देण्यासाठी आणि लायसन्स रिन्युअलसाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी करणाऱ्या दोन खासगी आरटीओ एजंट्सना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबईच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. आरोपी मुस्तफा नुरमोहम्मद सेलोट आणि राजेंद्र प्रसाद बिंद या दोन खाजगी दलालांनी आरटीओ अधिकाऱ्यांच्या नावावर तक्रारदाराकडून ३,५०० रुपयांची तडजोड केलेली लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. १७ जून २०२६ रोजी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रेस नोट क्रमांक १७/२०२६ द्वारे या कारवाईची अधिकृत माहिती दिली आहे.
या कारवाईची सविस्तर हकीकत अशी की, तक्रारदार यांचे जप्त करून ब्लॉक करण्यात आलेले ड्रायव्हिंग लायसन्स पुन्हा सुरू करून रिन्युअल मिळवण्यासाठी ते अंधेरी आरटीओ कार्यालयात गेले होते. तेथे त्यांची भेट खासगी आरटीओ एजंट मुस्तफा नुरमोहम्मद सेलोट याच्याशी झाली. सेलोट याने संबंधित आरटीओ अधिकाऱ्याकडून काम करून घेण्याच्या मोबदल्यात ४,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी ११ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी, मुंबई येथे रीतसर तक्रार नोंदवली.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने १२ जून २०२६ रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली. पडताळणीदरम्यान आरोपी मुस्तफा सेलोट याने तक्रारदाराकडे ४,००० रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ३,५०० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर १५ जून २०२६ रोजी अंधेरी परिसरात सापळा रचण्यात आला. आरोपी मुस्तफा सेलोट याच्या सांगण्यावरून दुसरा एजंट आरोपी राजेंद्र प्रसाद बिंद याने तक्रारदाराकडून ३,५०० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. लाच स्वीकारतानाच पथकाने दोघांनाही रंगेहात पकडले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ (अ) आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई परिक्षेत्राचे अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण, पोलीस उप आयुक्त अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रशासन) अजित सुळगे, सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक जगदीश मोरे आणि पर्यवेक्षक अधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त हरिदास किल्लेदार यांच्या तपास पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.
Labels: Mumbai RTO Bribe Case, Andheri RTO Agents Arrested, Anti Corruption Bureau Mumbai, Driving License Racket, Mustafa Selot Trapped, Mumbai Crime News.
Search Description: Mumbai Anti-Corruption Bureau arrested two private RTO agents, Mustafa Selot and Rajendra Prasad Bind, for accepting a bribe to unblock a driving license at Andheri RTO.
Hashtags: #MumbaiACB #RTOBribery #AndheriRTO #CorruptionFreeMumbai #LicenceRacketBusted #CrimeNewsMumbai2026 #ACBRaid
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: