नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या तपपूर्तीनिमित्त देशात प्रथमच 'नरसिंह महायज्ञ; माजी खासदार अमर साबळे यांचा पुढाकार
या भव्य नरसिंह महायज्ञामध्ये एकूण ५७ पुरोहितांनी वेदमंत्रांचे पठण केले. तसेच लक्ष्मी-नारायणाचे प्रतीक म्हणून ५७ जोडप्यांनी या यज्ञात प्रत्यक्ष सहभागी होऊन ५४ आवर्तनांद्वारे यज्ञकुंडात आहुती दिल्या. संपूर्ण मंदिर परिसर यावेळी अत्यंत प्रसन्न, पवित्र आणि भक्तिमय वातावरणाने प्रफुल्लित झाला होता. महायज्ञाच्या मुख्य विधीनंतर विठ्ठल-रुक्मिणी आणि श्रीकृष्णाच्या भजनांचा गजर करण्यात आला आणि महाआरती पार पडली. याप्रसंगी उपस्थित सर्व भाविकांना आणि नागरिकांना संयोजन समितीच्या वतीने माजी खासदार अमर साबळे आणि प्रसेनजीत फडणवीस यांच्या हस्ते पवित्र भगवद्गीता ग्रंथाचे वाटप करण्यात आले. महाप्रसादाच्या वितरणाने या सोहळ्याची सांगता झाली.
या संपूर्ण सोहळ्याचे अचूक व्यवस्थापन आणि नियोजन इस्कॉन श्रीकृष्ण मंदिर समितीचे उपाध्यक्ष श्वेत दिप दास, रेवती पती दास, तसेच कौस्तुभ प्रभु दास, गोविंद प्रसाद दास आणि ध्रुव महाराज दास यांनी चोखपणे सांभाळले. या महायज्ञाला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रसेनजीत फडणवीस, वेणूताई साबळे, सम्यक साबळे, सुजाता पालांडे, विनायक गायकवाड, ममता गायकवाड, विजय शिनकर, अजय पाताडे, महेंद्र बाविस्कर, अजित कुलथे, कायलास सानप, युवराज लांडे, ललित झुंझुनवाला, हनुमंत लांडगे, सुनील लांडगे, अनिता वाळुंजकर, गणेश वाळुंजकर, दिलीप राऊत, निर्गुण कवळे, संतोष टोणगे, सागर मारणे, स्वाती देशमुख, अनघा रुद्र, मनोज देवळेकर आणि किशोर शिनकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आणि भाविकांनी उपस्थित राहून या राष्ट्रीय संकल्पात्मक सोहळ्याचा लाभ घेतला.
Labels
Narendra Modi 12 Years, Narasimha Mahayagna Pune, Amar Sabale BJP, ISKCON Katraj Pune, Developed India 2047, Prasenjit Fadnavis, Pune Religious Events 2026
Search Description
To mark the completion of 12 years of PM Narendra Modi's tenure, a historic Narasimha Mahayagna was organized at the ISKCON Temple in Katraj, Pune, by former MP Amar Sabale.
Hashtags
#NarendraModi #NarasimhaMahayagna #PuneNews #ISKCONKatraj #AmarSabale #VikasitBharat2047 #Modi12Years #PuneEvents
Reviewed by ANN news network
on
६/१०/२०२६ १०:१०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: